Video: पुणे-नगर महामार्गावर शुकशुकाट...

शिक्रापूर, ता. 22 मार्च 2020 (एन.बी. मुल्ला): जनता कर्फ्यूमुळे पुणे-अहमदनगर महामार्गावर आज (रविवार) शुकशुकाट होता.


पुणे-अहमदनगर महामार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. कोरोना जनजागृती मुळे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने व पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्याने सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे घरीच थांबून कर्फ्यूला प्रतिसाद दिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.




कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने प्रवास टाळत आहेत. त्यामुळे देखील वाहतुकीवर परीणाम झाल्याचे चित्र आहे. एरव्ही महामार्गावरील शिक्रापूर येथील चाकण चौक व पाबळ चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच असते. मात्र, आज कर्फ्यूमुळे पुणे-अहमदनगर महामार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र होते. अधून-मधून येणाऱ्या एखाद्या वाहनावर व दुचाकीस्वारांना देखील महामार्गावरील पोलीस अडवून विचारपूस करत होते तर वेळप्रसंगी त्यांच्यावर कारवाई देखील होताना दिसत होती. एकंदरीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बहुतांश गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने परिसरातील व्यवहार ठप्प झाल्याने तसेच करोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लोक स्वयंस्फूर्तीने प्रवास टाळत आहेत.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या