या कारणास्थव मार्केट यार्ड बंद तर ८ कोटींचा व्यापार ठप्प ...

Image may contain: one or more people and outdoor
पुणे, ता. २३ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मार्केट यार्डातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.त्यामुळे तब्बल ७ ते ८ कोटींचा व्यवहार थांबला.मात्र, येत्या सोमवारी (दि. २३) मार्केट सुरू राहणार असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांना मास्कचे वाटप केले जाणार आहे.त्याचप्रमाणे प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ हात धुण्यासाठी पाणी, लिक्विड सोफ व सॅनिटायजर ठेवले जाणार आहे.त्याचप्रमाणे कोरोना कसा पसरतो, त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे.याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे.गेल्या शुक्रवारपासून गुलटेकडी येथील मार्केट यार्डमधील व्यवहार बंद आहेत.तसेच गुढीपाडवा या सणाच्या पूर्वीचा रविवार असूनही पुण्यातील मार्केट बंद ठेवले.मात्र, दर रविवारी मार्केट यार्डातील सुमारे ४०० टक्के भाजीपाला येतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जनता कर्फ्यू' हा उपक्रम देऊन सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले.मार्केट यार्डात एकही भाजीपाल्याचा ट्रक दाखल झाला नाही.परंतु, नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवणार नाही, याची खबरदारी शासनाकडून घेतली जात आहे.त्यामुळे सोमवारी मार्केट यार्ड सुरू राहणार आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

परिणामी नागरिकांना भाजीपाला व फळे उपलब्ध होऊ शकतील.आडते असोसिएशनचे विलास भुजबळ म्हणाले, शक्यतो रविवारी कधीही मार्केट यार्ड बंद ठेवले जात नाही.मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.त्यामुळे मार्केटमध्ये ४०० ट्रक येऊ शकले नाही.परिणामी ७ ते ८ कोटींचा व्यवहार ठप्प झाला.परंतु, सोमवारी मार्केट यार्डातील भाजीपाला, कांदा, लसूण व बटाटा मार्केट सुरू ठेवले जाणार आहे.मार्केट यार्डाचा परिसर रविवारी निर्जंतुक करण्यात आला आहे.स्वच्छतागृहांमध्ये लिक्विड सोप, सॅनिटाजर ठेवले जाणार आहेत.तसेच पहाटे ३ वाजल्यापासूनच दुपारी १२ वाजेपर्यंत मार्केट यार्डमधील व्यवहार सुरू ठेवले जातील.तसेच बाजारात किरकोळ खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार नाहीत.स्वच्छता राखण्यासाठी पाणी, सॅनेटाजर, लिक्विड सोफ आदी ठेवले आहे.तसेच आडते असोसिएशनसह काही गणेश मंडळातर्फे शेतकरी व व्यापाऱ्यांना मास्कचे वाटप केले जाणार आहे. - बी. जे. देशमुख, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.


मार्केट यार्डात पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतून शेतकरी व व्यापारी शेतमाल घेऊन येतात.त्याचप्रमाणे मुंबई व उपनगरातील काही व्यापारी पुण्यातून भाजीपाल्याची खरेदी करण्यासाठी येतात.मात्र, कोरोनाचा फौलाव रोखण्यासाठी मार्केट यार्ड बंद ठेवणे गरजेचे आहे.परंतु, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे.त्यामुळे रविवारी मार्केट यार्डातील व्यवहार सुरू राहणार आहे, असेही भुजबळ म्हणाले.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या