मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभाग बुधवारपासून बंद...

Image may contain: outdoor
पुणे, ता. २३ मार्च २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या बुधवारपासून (दि. 26) ३१ मार्चपर्यंत मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला, कांदा, बटाटा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड असोसिएशन आणि कामगार संघटनांनी घेतला आहे.फुल बाजारही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार येणार असल्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे.शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे ३ दिवस फळ, भाजीपाला विभाग बंद होता.त्यानंतर आज सोमवारी मार्केट सुरू झाले.उद्या मंगळवारी सुरू राहणार आहे.त्यानंतर पाडव्यापासून म्हणजे बुधवारपासून मार्केट पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि उपाध्यक्ष युवराज काची यांनी दिली.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

सध्या कोरोना या गंभीर आजाराने थैमान घातल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.कामगार संघटनाही या बंधात सहभागी होणार आहेत.याविषयी कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले की, कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घरचे लोक कामगारांना कामावर पाठवत नाहीत.नेहमीच्या तुलनेत आज केवळ २० ते २५ टक्केच कामगार कामावर होते.तसेच, बाजारात येणारे लोक कोणत्याही प्रकारची काळजी घेताना दिसत नाहीत.त्यामुळे बाजारातून कोरूनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.कामगाराला काय झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, त्यामुळे आम्ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या