गॅस वितरकाकडून सामान्यांची लूट; पाबळमध्ये गुन्हा दाखल

No photo description available.
शिक्रापुर,ता. २४ मार्च २०२० (विशाल वर्पे) : करंदी (ता.शिरुर) येथील ग्राहकांच्या सतर्कतेमुळे गॅस वितरकाचा काळा बाजार उघडकीस आला आहे.गॅस सिलेंडर मधून तब्बल अडीच किलो गॅस कमी येत असल्याने वितरक ग्राहकांची लूट करत असल्याचे समोर आले आहे.पाबळ (ता. शिरूर) येथील मे. शामा भारत गॅस ग्रामीण वितरकाची गाडी गॅस वितरणासाठी करंदी गावात येत असते अनेकवेळा ग्राहकांनी गॅसच्या टाकीमध्ये गॅस कमी येत आहे.तसेच शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अतिरिक्त पैसे वसूल करत असल्याचे त्याचबरोबर कोणतीही पावती देत नसल्याची या वितरकाची तक्रार केली होती.मात्र वितरकावर कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ नाराजी व्यक्त करत होते.त्याच पार्शवभूमीवर काही ग्राहकांची लूट होत असल्याची बाब माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्ष ढोकले यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर प्रत्येक ग्राहकाने खरेदी केलेल्या गॅसच्या टाकीचे वजन केले असता प्रत्येक टाकीमध्ये तब्बल एक ते अडीच किलो गॅस कमी असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर याबाबत महसूल प्रशासनाला तक्रार केली असता महसूल प्रशासनाचे अधिकारी वेळेवर उपस्थित राहीले नाहीत.अखेर शिक्रापूर पोलीस स्टेशनशी संपर्क केला असता तात्काळ पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी यांनी धाव घेतली.त्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या आवारात शिरुर वैधमापनशास्त्रचे निरिक्षक द. प्र. उपरे यांनी या घटनेचा पंचनामा केला.आणि मे. शामा गॅस वितरक गुन्हा दाखल केला आहे.त्याचबरोबर या वितरकाचा गाडीत वजनकाटा उपलब्द नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान प्रत्येक ग्राहकाकडून तब्बल चौतीस रुपये आकारले जात असून देखील याची कोणतीही रीतसर पावती ग्राहकांना दिली जात नाही त्यामुळे ग्रामस्थ यावेळी संतप्त झालेले पाहायला मिळाले.दरम्यान करंदी गावामध्ये रोज किमान ३० टाक्या वितरित केल्या जातात प्रत्येक टाकीमध्ये सरासरी किमान दोन किलो गॅस चोरी केल्याने किमान एकट्या करंदी गावातच रोजची तीन ते चार हजार रुपयांची लूट केली जात आहे त्यामुळे या एका गावचीच वर्षाला तब्बल दहा ते बारा लाख रुपयांची लूट होत असल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.याबाबत किरण ढोकले, विकास दरेकर, कैलास नप्ते, शिवाजी दरेकर, नृसिह ढोकले यांनी या वितरकाचा परवाना रद्द करण्याची मागणी केली आहे.त्याचबरोबर शिरुर बाजार समितीचे संचालक शंकर जांभळकर यांनी या वितरकावर योग्य ती कारवाई न झाल्यास परिसरातील गावातील ग्राहकांना सोबत घेऊन आंदोलन छेडणार असल्याचा इशारा www.shirurtaluka.com शी बोलताना दिला आहे.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

राजकीय पदाधिकारी गॅस वितरकाच्या बाजुने...?
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष या वितरकाच्या बचावासाठी अधिकाऱ्यांना विनवणी करण्यासाठी पंचनामा स्थळी हजार झाले होते त्यामुळे अशा वितरकांना राजकीय मंडळी पाठीशी घालत असल्याचे समोर आले आहे.सामान्य नागरिकांची लूट करणाऱ्यांच्या विरोधात सामान्यांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी अशा प्रकारे राजकीय मंडळी लुटारूंना पाठीशी घालत आहेत त्यामुळे सामान्यांनी कोणाकडे मदत मागायची असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.


No photo description available.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या