पहिल्या कोरोना बाधित दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत

Image may contain: plant
पुणे, ता. २४ मार्च २०२० (प्रतिनिधी): महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.



महाराष्ट्रात ९ मार्च रोजी पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोघं रुग्ण पती-पत्नी होते.ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत १ मार्चला दुबईवरुन आले होते.६ मार्चपर्यंत त्यांना कोणतीही लक्षणं दिसली नाहीत.मात्र ९ मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागली.म्हणून त्यांनी दोघांचीही रक्त तपासणी केली असता,ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते.या दाम्पत्यावर १३ ते १४ दिवस उपचार केल्यानंतर आज अखेर या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांच्या रक्त तपासणीत कोरोना निगेटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या