महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली

Image may contain: plant
मुंबई,ता.२४ मार्च २०२० (प्रतिनिधी): महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असुन राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही १०१ वर पोहोचली आहे.आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात ३ लोकांनी आपला जीव गमावला आहे.तसेच समाधानकारक बाब म्हणजे मुंबईतील कोरोनाग्रस्त असलेल्या १२ रुग्णांची तपासणी केली असुन या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.महत्वाची बाब म्हणजे हे रुग्ण ठणठणीत बरे झाल्याची माहिती मिळत आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३१ मार्च पर्यंत संचारबंदी लागु केली आहे.परंतु अजुनही काही नागरिक याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.सोमवारी आणि मंगळवारी सकाळी नागरिक आपल्या खासगी वाहनांसोबत रस्त्यावर उतरलेले दिसले.एवढंच नव्हे तर मुंबई आणि पुणे भाजी मार्केटमध्ये सर्रास फिरताना दिसत आहेत.त्यामुळे सरकारने कडक पाऊल उचलणं गरजेचे आहे.


जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख ७५ हजारांच्या वर गेला असून मृतांचा आकडाही १६,५०० च्या जवळ पोहचला आहे.इटलीमध्ये मृतांचा आकडा वाढतच असून एका दिवसात ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.तसेच अमेरीकेतही मृतांचा आकडा ५५० च्या जवळ पोहचला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात फारच वेगानं होत आहे.युरोप आणि अमेरिकेत रोज शेकडो मृत्यू होत आहेत.इटलीमध्ये कोरोनाचा कहर सुरुच असून २४ तासांत इटलीत आणखी ६०१ बळी गेले आहेत.इटलीत कोरोना बाधितांची संख्या ६४ हजाराच्या घरात पोहचली असून मृतांचा आकडा ६०७७ इतका झाला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या