कोरोना मुळे तामिळनाडूत आणखी एकाचा मृत्यू

Image may contain: plant
मदुराई,ता.२५ मार्च २०२० : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशातील मृतांची संख्या वाढत असुन आता कोरोना व्हायरस मुळे मृत्यु झालेल्यांचा आकडा ११ वर गेला आहे.कोरोना व्हायरसची लागण झाल्याने अजून एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे.कोरोनामुळे तामिळनाडूत पहिला बळी गेला आहे.तसेच धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती विदेशात जाऊन आलेली नव्हती. २३ मार्चला या व्यक्तीला संक्रमन झाले होते.यानंतर राजाजी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.तामिळनाडूतील मदुराई येथील राजाजी रुग्णालयात या ५४ वर्षीय रुग्णाने अखेरचा श्वास घेतला. या रुग्णाला मधूमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता.त्यामुळे त्याची प्रकृती वारंवार खालावत होती.आज सकाळी या रुग्णाने अखेरचा श्वास घेतला.तामिळनाडूमध्ये आतापर्यंत कोरोनाची १८ प्रकरण समोर आली  आहेत.यामधील एकाचा मृत्यू झाला आहे.तर १ रुग्ण बरा झाला आहे.देशभरात कोरोनाचे आतापर्यंत ५६० प्रकरणं समोर आली आहेत. यामधील ११ जणांचा मृत्यू आणि ४६ बरे झाले आहेत.रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या