सादलगाव येथे भगव्या गुढ्या उभारून गुढी पाडवा साजरा

Image may contain: cloud, sky and outdoor
सादलगाव,दि. २६ मार्च २०२० (संपत कारकूड): सादलगाव(ता.शिरुर) येथे गेल्या ३ वर्षांपासून गावातील नागरिक आपल्या घरासमोर भगव्या झेंड्याच्या गुढ्या उभारून गुढीपाडव्याचा सण साजरा करतात.३ वर्षांपूर्वी  गावातील एका व्हाट्सअप ग्रुपवर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या कशी झाली.याबाबत इतिहास सांगणारी एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती.गुढीपाडवा सणापूर्वीच्या या पोस्ट मध्ये हा सण कसा साजरा करावा तसेच या दिवशी गुढी  कशी उभारावी...?  याविषयी माहिती स्पष्ट करण्यात आली होती.गुढी उभारण्या पाठीमागील गूढ उलगडून सांगणारी हि पोस्ट होती.तसेच सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडणारी ही पोस्ट होती.कारण फाल्गुन अमावास्येला  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी येते.धर्मासाठी बलिदान करणारा राजा व त्यांचा इतिहास नुकत्याच झी मराठीवर झळकलेल्या "स्वराज्य रक्षक संभाजी" या मालिकेने सर्वाना ठळक करून दाखविला आहे.


स्वराज्यासाठी संभाजी महाराज यांच्या असामान्य बलिदानाच्या भावना एकीकडे तर दुसरीकडे नवीन मराठी वर्षाची सुरवात अश्या कडू आणि गोड अनुभवाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा करण्याची भावना गावात रुजली गेली.नवीन वर्षाचा आनंद जरूर आहे.परंतु एक महान राजा औरंगजेबाकडुन क्रुर पद्धतीने हत्या करुन मारला गेला.आणि तीच प्रेरणा सर्वाना देऊन गेला.बस्स हिच  जाणीव राहावी म्हणून बलिदान दिनाचे औचित्य सदैव राखावे हीच भगव्या गुढी उभी करण्यापाठीमागील भावना असल्याचे ग्रामस्थांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले.सादलगाव येथे गेल्या ३ वर्षांपासून ग्रामस्थांनी हि परंपरा सुरू केली असुन आसपासच्या गावातील नागरिकांनी याचे अनुकरण करावे,अशी इच्छा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या