सगळीकडे आलाय कोरोना वाळुमाफीया मात्र थांबेना...

Image may contain: sky, tree, outdoor, nature and water
शिंदोडी, ता. २६ मार्च २०२० (तेजस फडके): देशात आणि राज्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर लॉक डाऊन असताना चिंचणी(ता.शिरुर) येथील घोड धरणात मात्र रात्रंदिवस सर्रास बेकायदेशीर वाळु उपसा चालु असुन वाळुमाफीया परप्रांतीय कामगारांच्या जीवाशी खेळत आहेत.सध्या महसुल यंत्रणा आपत्कालीन सेवेत व्यस्त असल्याने वाळुमाफीयांनी याचाच फायदा घेत घोड नदीपात्राची अक्षरशः चाळण केली आहे.रात्रंदिवस वाळुउपसा चालु असल्याने धरणाच्या कडेला राहणाऱ्या लोकांच्या मात्र झोपा उडाल्या आहेत.



गेल्या अनेक दिवसांपासुन घोड धरणात बेकायदेशीर वाळुउपसा चालु असुन घोड धरण म्हणजे वाळुमाफियांचा अड्डाच झाला आहे.अनेक राजकीय लोकांचा यात सहभाग असुन शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील विविध पक्षाचे मात्तबर नेते यात सामील आहेत.त्यामुळे महसुल विभागाने वेळोवेळी कारवाई करुनही वाळुमाफीया घाबरत नाहीत.त्यामुळे घोड धरणातील मच्छिमारांचे मात्र अतोनात हाल होत आहेत.वाळुमाफियांच्या दहशतीपुढे मच्छिमार हतबल झाले आहेत.


करोडो रुपयांचा महसुल बुडत असुनही अधिकारी गप्प का...?
घोड धरणात दाणेवाडी,पिंपळाचीवाडी,कुऱ्हाडवाडी आणि शिंदोडी येथे गेल्या वर्षभरापासुन सर्रास अवैधरीत्या बेकायदेशीर वाळुउपसा चालु असुन आत्तापर्यंत शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडाला आहे.तसेच सामाजिक कार्यकर्ते,सामान्य नागरीक,पत्रकार यांनी वेळोवेळी या गोष्टीवर आवाजही उठवला आहे.परंतु महसुल विभागाचे वरीष्ठ अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत.वाळुमाफियांवर कारवाई होते पण ती तात्पुरती स्वरुपाची असते.त्यामुळे वाळुमाफियांना प्रशासनाची भितीच उरलेली नाही असेच चित्र सगळीकडे दिसत आहे.


स्थानिक पुढाऱ्यांचा वाळुमाफियांना पाठींबा...?
काही दिवसांपुर्वी शिंदोडी येथील घोड नदीच्या पात्रात वाळुच्या बोटीवर कारवाई करण्यात आली.वाळु वाहुन नेणारे फायबर जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आले.तसेच वाळुउपसा करणारी बोटही क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात येणार होती.परंतु शिंदोडी येथील एका स्थानिक राजकीय पुढाऱ्याने महसुल विभागाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकला त्यामुळे अधिकारी अर्धवट कारवाई करुनच परत गेले.शिंदोडी येथील हा पुढारी वाळुमाफियांकडुन वाळुच्या बोटी चालविण्यासाठी प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम घेत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.काही दिवसांपूर्वी याच पुढाऱ्याने वाळुउपशाला विरोध करत तहसिल कार्यालयावर मोर्चा काढला होता.त्यामुळे आता "कुंपनच शेत खातंय" असा काहीसा प्रकार चालु आहे.


अन शेवटी क्रेन आलंच नाही...
शिंदोडी येथील ग्रामपंचायत सदस्य एकनाथ वाळुंज,RTI कार्यकर्ते रामकृष्ण गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी ओव्हाळ यांनी वेळोवेळी शिरुरच्या तहसिलदार लैला शेख यांच्याकडे पाठपुरावा करुन वाळुउपसा बंद व्हावा.याबाबत पाठपुरावा केला होता.त्यामुळे तहसिलदार शेख यांनी नायब तहसीलदार श्रीशैल्य वट्टे आणि महसुलचे कर्मचारी गोसावी यांना कारवाईसाठी पाठवले होते.त्यावेळी वाळुउपसा करणारी एक बोट सापडली होती.वाळु वाहतुक करणारी  फायबर बोट जेसीबीच्या साह्याने तोडण्यात आली.त्यावेळेस वाळुउपसा करणारी हायड्रोलीक बोट सुद्धा क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात येणार आहे अशी माहिती महसुलच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली.परंतु  ४ तास वाट पाहुनही क्रेन मात्र आलंच नाही.त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या