माझा फोन लागला नाही? द्या बर फोन, बघतो मी...

शिरूर, ता. 28 मार्च 2020: माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही, असे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील म्हणाले. तर कोण देत नाही द्या बर फोन, बघतो मीपण, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.


संबंधित वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि शिरूर तालुका चर्चेत आला. चर्चेमागचे कारण होते शेतीच्या कामासाठी लागणारे डिझेल. युवासेनेचे शिरुर तालुका प्रमुख संजय पवार यांना शेतीच्या कामासाठी डिझेल लागत होते. मात्र लॉकडाऊनमुळे पेट्रोलपंप बंद असल्यामुळे त्यांना डिझेलचा अव्वाच्या सव्वा दर त्यांना लावण्यात आला. त्यांनी शिवसेना नेते आढळराव पाटील यांना फोन लावला. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांनी अजित पवार यांना फोन लावून आपले काम केले. पण, माफ करा, पण माझा फोन लागला नाही असे कधीच होत नाही. काहीतरी चुकतयं. संजयला जर खरंच मला फोन लावायचा असता तर तो लागला असता. मुळात माझा फोन सर्वांना नेहमी लागत असतो, असे आढळराव पाटील यांनी म्हटले आहे.


संजय पवार यांनी शेतीची कामे सुरु असताना पेट्रोल पंप चालक डिझेल देत नाहीत, अशी तक्रार करणारा फोन अजित पवार यांना केला. त्यावर लगेचच 'कोण देत नाही डिझेल? दे बरं फोन त्याला' अशी आवाजातील जरब अजितदादांनी दाखवली आणि पेट्रोलपंप चालकांनी गपगुमान डिझेल दिले.


दरम्यान, दादांचा फोन लागला नाही हे मी पहिल्यांदा ऐकले. सर्व शिरूर लोकसभा मतदार संघतील जनतेला माहित आहे की दादांचा फोन कधीच बंद नसतो ही काळ्या दगडावरची रेष आहे, असे आंबेगाव तालुका संघटक देवीदास आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. पण, या फोनची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.

उपमुख्यमंत्री पवार आणि संजय पवार यांच्यातील मोबाईल संवाद व्हायरल झाला आहे. संजय पवार यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात हा फोन केला होता. प्रत्युत्तरादाखल अजितदादांनी प्रश्न सोडविण्यासंदर्भात जी तत्परता दाखवली, त्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.

अजितदादा व संजय पवार यांच्यात झालेला संवाद पुढीलप्रमाणे:
संजय पवार: दादा, संजय पवार बोलतोय. युवा सेना शिरूर तालुका प्रमुख.
अजितदादा: बोला.
संजय पवार: दादा, प्रॉब्लेम काय झालाय. काल थोडा अवकाळी पाऊस झाला ना आणि आता सगळ्यांचे गहू काढायला आलेत आणि गव्हाच्या हार्वेस्टिंगला पेट्रोल पंप वाले डिझेल देईनात."
अजितदादा:  अहो मी आता पुण्याच्या एस पी कलेक्टर यांना सांगितलेले आहे. मशिनला डिझेल पेट्रोल द्यायला. शेतकऱ्यांच्या कामाला डिझेल पेट्रोल द्यायला सांगितले आहे. 
संजय पवार:  ओ के दादा चालेल
अजितदादा:  कोण देत नाही. द्या बर फोन.
संजय पवार: नाही आता आम्ही हिकडं आलोय. पंपावर पोलीस बंदोबस्त आहे.
अजितदादा: अहो, द्या ना कोण देत नाही. बघतो मीपण.
संजय पवार:  तिथं गेलं की मी फोन करतो तुम्हाला दादा.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या