निमगाव म्हाळुंगी येथे मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप...

Image may contain: one or more people and people standing
तळेगाव ढमढेरे, ता. २८ मार्च २०२० (आकाश भोरडे): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील शिवराज्य प्रतिष्ठाण च्या वतिने परिसरातील नागरिकांना सुमारे २५० सॅनिटायझर व ११०० मास्क चे वाटप करण्यात आले.तसेच कोरोना या विषाणूबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी याची माहिती यावेळी देण्यात आली.कोरोना व्हायरसच्या महामारीने जगात थैमान घातले आहे.हा विषाणू आता महाराष्ट्रामध्ये पसरू पाहत आहे या कोरोना चा प्रादुर्भाव रोखनेसाठी शासनाने राज्यात संचार बंदी लागू केली आहे.प्रशासन अत्यंत काळजीपूर्वक याचा सामना करत आहे.या आजारावर अद्यापपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नसल्याने यापासून स्वतःचा बचाव कसा करावा या संभ्रमावस्थेत नागरिक आहेत.मात्र गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हातांची स्वच्छता, तोंडाला मास्क लावून व योग्य ती खबरदारी घेतल्याने या विषाणूला रोखता येऊ शकते.

Image may contain: text that says 'भाषण करायला शिका... लाखो लोकांसमोर निर्भयतेने बोला! Art of Speech मो.नं. 9860927799 9615927799 प्रभावी वक्तृत्वाचा पासवर्ड... फक्त इथेच!'

परंतु, शहरात व गावांमध्ये मास्क व सॅनिटायझरचा तुटवडा असल्याने बरेचसे नागरिक या सुविधांपासून वंचित आहे.अशाने हा जंतूसंसर्ग आणखी पसरण्याचा धोका आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शिवराज्य प्रतिष्ठाणच्या वतीने मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.यावेळी  शिवराज्य प्रतिष्ठाण चे अध्यक्ष बाप्पुसाहेब बबनराव काळे, अजितशेठ चौधरी, सुनिता जायकर सागर चव्हाण,दादा जायकर,सौरभ चव्हाण,उमेश चौधरी, मनोज तावरे, हर्षद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या