...आणी सुट्टीतही सुरू झाली मोबाईल शाळा

मुखई, ता. 30 मार्च 2020 (एन. बी. मुल्ला): कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच शाळेंना १६ मार्च पासून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आश्रमशाळेतील सर्वच मुलं पालकांनी वसतीगृहातून आपल्या आपल्या घरी नेली आहेत.


मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये. यासाठी मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे माध्य.आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्याला मुलांच्या अभ्यासाठी काय करता येईल यावर विचारविनियम केला. त्यानंतर आपली शाळा डिजीटल शाळा आहे, आपण सर्वजन तंत्रस्नेही शिक्षक आहोत याचा विचार करुन शाळेतील सर्व शिक्षकांनी ठरवले की आपण शाळा ऑनलाईन सुरु ठेवायची.शाळा ऑनलाइन चालू ठेवण्याच्या नियोजनाप्रमाणे प्रथम सर्व वर्गशिक्षकांनी इ. ८ वी, ९ वी, ११ वी विज्ञान, ११ वी कला आदी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे नंबर घेऊन व्हॉटस्अॅप ग्रुप तयार करून त्यात प्रत्येक विषय शिक्षकांना समाविष्ठ केले. सर्व पालकांना वैयक्तीक फोन करुन कळवले की आपण मोबाईलद्वारे शाळेचा अभ्यासवर्ग चालू करणार आहोत. त्याची वेळ, त्याची सर्व पध्दती समजावून सांगण्यात आली. सर्व विषय शिक्षकांनी पुढील ३० दिवसाच्या अभ्यासाचे, घटकांचे वर्गानुसार लिखित नियोजन केले आणि २० मार्चपासून सुरू झाली मोबाईल शाळा. ग्रुपवर दैनदिन अभ्यास वर्गानुसार रोजच्या रोज सुरु झाला. आजचा काय अभ्यास आहे तो मुलांपर्यंत पोहचू लागला. मुलं रोजच्या रोज नियमित दिलेला अभ्यास पूर्ण करु लागले. त्यात सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात. मुलं आनंदाने अभ्यास करतात. मुलांच्या अडचणी मुलं मोबाईलवर सांगतात त्या सगळ्या समस्या शिक्षक ऑनलाईन सोडवून देतात.


व्हीडीओ लेक्चर द्वारे, गुगल अॅप, लिंक, गुगल द्वारे सर्व उपलद्ध संदर्भ या सर्वांचा वापर शिक्षक करतात. त्यामुळे शाळेतील शिक्षक व मुलं नियमित शिक्षण घेणे व देणे सोप झालं आहे . मुलांचा राहीलेला अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सराव सुध्दा नियमित चालू आहे. सेमी इंग्रजी, विज्ञान, गणित, तसेच ११ विज्ञान मधिल सर्वच मुलांना याचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. विज्ञान शाखेच्या मुलांसाठी सीईटी, जेईई, नीट या स्पर्धा परीक्षेचाही अभ्यासक्रम नियमित पूर्ण केला जात आहे त्यामुळे मुलांच्या व पालकांच्या प्रतिक्रीया खूप चांगल्या सकारात्मक येत आहेत. मुलांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील मार्गदर्शन करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण होत आहे. लॉक डाऊनच्या काळात हा आश्रमशाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम मुलांसाठी एक अनोखी संधी, संजीवणी ठरत आहे.

शाळेत नेहमीच नविन नविन उपक्रम राबवले जातात. त्यातीलच हा मोबाईल शाळेचा उपक्रम हा मुलांना आनंद देणारा व अभ्यासातही उत्साह निर्माण करणारा आहे. घरी सुरक्षित राहून घरबसल्या शिक्षणात खंड पडू न देणारा व शिक्षणास उपयुक्त असा हा शैक्षणिक उपक्रम असल्याचे मत विदयालयाचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी व्यक्त केले. काळानुरुप असे विदयार्थी हिताचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे मत संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. अशोकराव पलांडे यांनी व्यक्त केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे व सचिव सुरेश पलांडे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या