चिमुकल्यांची कोरोना लढयासाठी आर्थिक मदत...

Image may contain: plant
देवदैठण, ता. १ एप्रिल २०२० (संदीप घावटे): जगासह देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत आहे.भारतात व राज्यातही रुग्णसंख्या वाढत असुन कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.हि बाब लक्षात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील संस्कार शिक्षण संस्था संचालित संस्कार पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या चिमुकल्यांनी " तान्हाजी " हा चित्रपट पाहण्यासाठी जमा केलेले ११८०० रुपये पंतप्रधान निधीत जमा करून सर्वांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे.


कोरोना या रोगाचा राज्यात प्रादुर्भाव होण्याआधी या स्कूलचे विद्यार्थी तान्हाजी हा इतिहास विषयक चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात जाणार होते.त्यासाठी विद्यार्थांनी चित्रपटासाठी लागणारे पैसे जमा केले होते. परंतु ज्यादिवशी चित्रपट पाहण्यासाठी जाणार होते त्याच दिवशी शासनाकडून चित्रपटगृह बंद करण्याबाबतचे आदेश आले.नंतरच्या कालावधीत राज्यात संचारबंदी लागू झाल्याने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला गेला.त्यामुळे हा रद्द झालेला चित्रपट पाहण्याचा उपक्रम पुढे ढकलण्यात आला.

        
दरम्यानच्या काळात देशावर आणि राज्यावर आलेल्या या आपत्तीत गरजूंना मदत व्हावी यासाठी आपणही थोडा फार हातभार लावावा या उद्देशाने स्कूलच्या काही विद्यार्थ्यांनी संस्थेचे अध्यक्ष संजय कौठाळे यांना फोनवरून आपण चित्रपटासाठी जमा केलेली रक्कम पंतप्रधान निधीत जमा करण्याबाबतची इच्छा दर्शवली. क्षणाचाही विचार न करता विद्यार्थ्यांच्या या उद्दात्त वृत्तीचे कौतुक करून सोशल मिडीयाच्या माध्यमातुन इतर सर्व विद्यार्थांचे या विषयावर मत मागवले व त्यांची जमा असलेली सर्व रक्कम पंतप्रधान दक्षता निधीत पाठवली.याबाबत www.shirurtaluka.com शी बोलताना संजय कौठाळे म्हणाले की शाळा सुरू झाल्यावर संस्थेतर्फे सर्व विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवला जाईल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या