Video: सणसवाडीतील नागरिकांवर 'ड्रोन'ची नजर

सणसवाडी, ता. 2 एप्रिल 2020 (PoliceKaka): करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायत वतीने नागरी वस्तीवर लोकांची गर्दी वाढू नये यासाठी 'ड्रोन'द्वारे नजर ठेवण्यात येत आहे. सणसवाडी उद्योग नगरी असल्याने नोंद व नोंद नसलेली लोकसंख्या जवळपास 25 हजारांच्या घरात आहे.सणसवाडीत कामानिमित्त परजिल्हा व परराज्यातील कामगार संख्या मोठ्याप्रमाणात आहेत. लहान-लहान खोल्यांमध्ये राहणारी कुटुंबे असल्याने जिवनावश्‍यक वस्तू व भाजीपाला खरेदीसाठी नागरिक बाहेर फिरत असतात त्यांच्यावर कडक निर्बंध यावेत म्हणून 'ड्रोन'द्वारे पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
नागरिकांनी गर्दी करू नये व घरात राहून सहकार्य करण्या बाबत 'स्पिकर्स'द्वारे आवाहन करण्यात येत आहे. सणसवाडी परिसरात करोना विषयक जनजागृती सतत सुरू असल्याचे सरपंच रमेश सातपुते यांनी सांगितले. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, तलाठी, पोलीस पाटील युद्ध पातळीवर कामकाज करीत असून नागरिकांना सतत आवाहन करीत आहेत.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या