Video: वाघाळे येथे कलासागर प्रतिष्ठानकडून फवारणी...

Image may contain: 2 people, people standing, shorts, outdoor and nature
वाघाळे, ता. 3 एप्रिल 2020: जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून, यावर प्रतिबंध मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वाघाळे (ता. शिरूर) येथील कलासागर प्रतिष्ठानने गावामध्ये कोरोना प्रतिबंधक औषधांची फवारणी केली. कलासागर प्रतिष्ठानकडून सातत्याने सामाजिक कामे केली जातात.


वाघाळे गाव मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा म्हणून वाडी-वस्तीवर कोरोना प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात आली. या फवारणीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक पातळीवरती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गाव कामगार तलाठी सौ. गायकवाड यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वांना घरामध्ये राहण्यासाठी आवाहन करण्यात आले. गावातील परिसर निर्जंतुकीकरण करून स्वच्छ करण्यात आला. हे सर्व काम वाघाळे गावातील कलासागर प्रतिष्ठान व कालिका माता तरुण मंडळ यांच्या माध्यमातून स्वखर्चाने करण्यात आले, अशी माहिती  कलासागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ओंकार थोरात यांनी दिली.


या कामासाठी उत्तम कारकूड, माजी सरपंच जयराम कारकूड, दादाभाऊ सोनवणे, हनुमंत कारकूड, मानसिंग कारकूड, गजानन थोरात, योगेश शेळके, अमित सोनवणे, गोरक्ष कारकूड, बाळासाहेब कारकूड, किरण शेळके, महंत धनंजय बाबा बाळापूरकर, गोपाल शास्त्री बाळापूरकर आणि सर्व कालिकामाता तरुण मंडळ आणि कलासागर प्रतिष्ठान या सर्वांच्या सहकार्याने ही फवारणी पूर्ण करण्यात आली. यापुढेही गावामध्ये विविध उपक्रम राबवून कोरोना व्हायरला हद्दपार केले जाईल, असे गावचे उपसरपंच दिलीप थोरात यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या