शिक्रापूरमध्ये गरजू व गरिबांना दोन टन धान्य वाटप...

शिक्रापूर, ता. 3 एप्रिल 2020 (शेरखान शेख): देशभरात कोरोनाचे संकट उभे राहिलेले असताना सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांचा रोजगार बंद झाला असल्यामुळे असंख्य नागरिकांच्या प्रपंचाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना शिक्रापूर येथे काही दानशूर व्यक्तींकडून गरजू व गरीब नागरिकांना दोन टन धान्य वाटप करण्यात आले आहे.

शिक्रापूर येथे गरजू व गरीब कुटुंबियांसाठी मदत करण्याचा निर्णय काही युवकांनी घेतला आणि त्यांनतर येथील उद्योजक राहुल ढमढेरे, पोलीस नाईक अनिल जगताप, पतंजली योग समितीचे अंकुश घारे, सामाजिक कार्यकर्ते, बाबा चव्हाण, महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार विजेते पत्रकार शेरखान शेख, प्रवीण शिवरकर, रियाज शेख यांनी गोरगरीब कुटुंबियांची माहिती घेत त्यांना दोन टन तांदूळ व गहू वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनतर गावातील आणि परिसरातील अनेक गोरगरीब व गरजू कुटुंबियांची माहिती घेत तसेच काही ठिकाणी असलेल्या झोपड्यांच्या ठिकाणी जात तब्बल दीडशे कुटुंबियांना दोन टन धान्यांचे वाटप केले आहे.

गावातील पुढारी कमरेवर हात ठेऊन गप्प...
शिक्रापूर येथे गोरगरिबांना धान्य वाटप प्रसंगी बोलताना अनेक ठिकाणी इतर गावातून उद्योग, व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने आलेले नागरिक हे गरिबांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत मात्र गावातील पुढारी कमरेवर हात ठेऊन निवांत व गप्प मजा घेत असल्याचे खेद वाटतो, असे मत सामाजिक कार्यकर्ते बाबा चव्हाण यांनी व्यक्त केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या