पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलीचा भावनिक Video पाहाच...

शिक्रापूर, ता. 3 मार्च 2020 (PoliceKaka): देशात लॉकडाऊन असताना पोलिसकाका डोळ्यात तेल घालून रस्त्यावर उभे आहेत. सर्वांचे वडील घरात असताना आपलेच वडील घरात नसल्याची खंत अनेक मुलांनी व्यक्त केली आहे. पण, या पोलिस काकांमुळेच देशात लॉकडाऊन पाळला जात आहे. सोशल मीडियावर एका पोलिस काकाच्या मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विलास आंबेकर यांची कन्या व शिक्रापूर (ता. शिरूर) येथील संस्कृती विलास आंबेकर या चिमुकलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. त्या व्हिडीओ मधून पोलिस यांना कायम कामावर जावेच लागले, घरी आल्यावर कितीही दमलेला असला, कितीही उशीर झाला असला तरी पोलिस त्याच्याजवळील सर्व वस्तू सेनीटायझरने पुसत असतो, हे पाहून त्याच्या आईला काय वाटत असेल, आंघोळ करून झाल्यावर माझे कपडे बाहेर ठेव हे ऐकून त्याच्या पत्नीला काय वाटत असले, दररोज आपल्या मुलांना जवळ घेणारा व जवळ घेऊन जेवण करणारा पोलिस बाप हा आपल्या मुलांना मुलानो माझ्यापासून लांब बसा रे असे म्हणतो यावेळी त्या वर्दीतील बापाला काय वाटत असेल, झोपताना आपण दिवसभरात कोणा कोरोना ग्रस्थांच्या संपर्कात आलो नाही ना असा विचार तो करत असेल.

पुन्हा दुसऱ्या दिवशी वर्दी घालून कामावर परंतु तेथे गेलेवर सर्व काही बंद त्यामुळे माझ्या मित्रांच्या खाण्याची सोय नाही हे आठवून रोज कामच करणारा वर्दीतील देवमाणूस दररोज रस्त्यावर उभा असणारा पोलिस कोणाचातरी मुलगा आहे, कोणाचातरी बाप आहे, कोणाचातरी भाऊ आहे, कोणातरी कुटुंबियांचा आधार आहे. त्यामुळे या देवमाणसाला आपण सहकार्य करायला हवे असे सांगत, प्रतापगडाच्या पायथ्यावर अफजलखान सहा महिने तळ ठोकून बसला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शांत डोक्याने गडाच्या आत बसून संयम राखून योजना आखत सहा महिन्याने औरंगजेबाचा वध करून टाकला तर आपण पण याच शिवरायांच्या याच मातीत जन्मलो ना, मग आपण एकवीस दिवस घरात राहू शकत नाही का? या पोलिसा काकांच्या साठी घरात राहू शकतो ना, माझे पप्पा देखील पोलिसच आहेत. या पोलिसांच्या मदतीसाठी आपण देखील घरात रहा, असे आवाहन संस्कृती आंबेकर या चिमुकलीने केले आहे. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या