करोनामुळे जगात ५३ हजार २३८ जणांचा बळी...

Image may contain: plant
मुंबई,ता.३ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): संपुर्ण जगभरात करोना या आजाराने थैमान घातले असुन लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.कोरोना या रोगावर अजुन कोणतेही औषध अथवा लस उपलब्ध नसल्यामुळे करोनाने जगातील २०४ देशांत आपले बस्तान बसवले असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला महामारी असे घोषित केले आहे.


करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली, स्पेन आणि अमेरिकेला बसला आहे.आर्थिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही या रोगाची धास्ती घेतली आहे. अमेरिकेत २ लाख ४४ हजार ८७७ जणांना करोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत ६  हजांरापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.सर्व जगात निम्म्या भागांमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची टाळेबंदी सुरू असतानाही गेल्या २४ तासांत करोना विषाणूने जगभरात हजारो बळी घेतले असून,यात स्पेनमधील नव्या १ हजार बळींचा समावेश आहे.जगभरात जेवढ्या लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे,त्यापैकी जवळजवळ एक चतुर्थांश लोक अमेरिकेतील आहेत.गुरुवारी सकाळपर्यंत तेथील करोना बळींची संख्या ५ हजारांपलीकडे पोहचल्याचे जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने सांगितले.जगभरातील देशांनी जारी केलेली आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या आकड्यांच्या आधारावर worldometers.info ने दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसने आतापर्यंत ५३ हजार २३८ जणांचा बळी घेतला आहे. तर १० लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात २ लाख १३ हजार ३५ जण करोनामुक्त झाले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या