पत्रकारांना पेट्रोलसाठी उडवाउडवीची उत्तरे...

Image may contain: one or more people
मांडवगण फराटा,ता. ८ एप्रिल २०२० (संपत कारकूड): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावशक सेवेमध्ये समाविष्ट असणारे कोणत्याही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अथवा वितरक यांना पेट्रोल देण्याबाबत मा. जिल्हाअधिकाऱ्यांचे आदेश असतानाही मांडवगण फराटा येथील फराटे पाटील पेट्रोलियम व हर्षद पेट्रोलियम तसेच इनामगाव येथील गिताई पेट्रोलियम पंपावर पत्रकारांना पेट्रोल देण्यासाठी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करण्यात आली.तसेच पंपमालकांनी पत्रकारांविषयी चुकीचे वक्तव्य केले.याबाबत शिरुरचे नायब तहसीलदार यादव साहेब यांच्या हि बाब निदर्शनास आणून दिली असल्याचे पत्रकारांनी सांगितले.


शिरुर तालुक्यातील पत्रकार हे रात्रंदिवस गावोगावी फिरुन कोरोना विषयी जनजागृती करुन वार्तांकन करत असतात.परंतु अनेक पंपचालक हे पत्रकारांना आयकार्ड दाखवुन सुद्धा पेट्रोल देण्यास टाळाटाळ करत आहेत.वृत्तपत्र तसेच वृत्तपत्र वितरित करणारे व्यक्ती यांचे ओळखपत्र तपासून त्यांना पेट्रोल व डिझेल पुरवठा करणेबाबत दि. ३१ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे आपत्ती व्यावस्थापन शाखा) यांनी स्पष्ट आदेश केले आहेत.असे असतानाही शिरुर  पूर्व भागातील वरील पेट्रोल पंप चालकांकडून पत्रकारांना पेट्रोल देणे नाकारले जात आहे.हि बाब लगेच नायब तहसीलदार यादव साहेब यांचे निदर्शनात आणून देण्यात अली असून त्यांनी पंपावर पत्रकारांना अडविले जाणार नाही, अश्या सूचना केला जातील,असे सांगितले.ग्रामीण भागात शेतकरी वर्गाला जनावरांचा चारा आणणे,घरातील वयोवृद्ध रुग्णांना दवाखान्यात ने-आण करणेसाठी, शेतातील तरकारी शेतातून बाहेर काढणेसाठी,दूध डेअरीपर्यंत पोहच करण्यासाठी पेट्रोल-डिझेल अत्यावश्यक आहे.परंतु वरील पंपावर मात्र शेतकऱ्यांसाठी,"कोणी पेट्रोल देता का पेट्रोल" असं  म्हणण्याची वेळ अली आहे.पेट्रोल स्टॉक असतानाही "पेट्रोल संपले आहे" असे फलक सध्या वरील पंपावर झळकत आहेत.


ग्रामीण भागात शेतकर्त्यांकडून शासनाने  दिलेल्या सर्व नियमांचे पालन होत असताना जर जगाचा पोशिंदाच जर अडविला जात असेल तर जगायचे कसे...?
हा प्रश्न पेट्रोल पंपावरील अडवणुकीमुळे निर्माण झाला आहे. दरम्यान काही पेट्रोल पंप चालकांनी १०० व  २००  रुपयाचे पेट्रोल देण्यास सुरवात केली असून शेत-वाड्या -वस्त्या करून राहणाऱ्या शेतकऱ्यांची गरज पूर्ण होत नसलेची तक्रार आहे.कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे किराणा माल दुकानदार वस्तू विक्रीमध्ये ज्यादा नफेखोरी करत आसलेमुळे त्यांना ग्रामपंचायतकडून सूचना करून असे प्रकार करू नका, तसेच आपल्याकडील स्टॉक व बाजारभाव फलक लावा अश्या सूचना स्थानिक पातळीवर केल्या जात असताना पेट्रोल-डिझेल विक्रीबाबत अशी सूचना किंवा पारदर्शकता का नाही...?असा प्रश्न गावातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.पेट्रोल-डिझेलची रोजची स्टॉक पोजिशन व बाजारभाव फलक पंपासमोर लावण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या