मांडवगण फराटा येथे जमावबंदीला हरताळ...

मांडवगण फराटा, ता. 11 एप्रिल २०२० (संपत कारकूड) : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे दर शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार सकाळी ९ वाजता भरला. पण, कोरोनाचे संकट असतानाही कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचे दिसून आले.

कोरोनाचे पार्श्वभूमीवर सगळीकडे धोका वाढत असताना तसेच ३१ एप्रिल २०२० पर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये जमावबंदी आदेश जारी असताना गावात बाजार भरविलाच कसा ? याची अधिक माहित जाणून घेतली असताना येथील सरपंचानी बाजारामध्ये ठराविक अंतर घेऊन भाजी विक्री करणेचे तोंडी सांगितल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

जगभरात कोरोना धुमाकूळ घालत असून, त्याने सर्वांची झोप उडवली आहे. ग्रामीण भागामध्ये याचा धोका होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात असताना मांडवगण फराटा येथे भरलेल्या बाजारामुळे धोका ओढून घेण्याचे प्रकार घडत आहे. येथील ग्रामपंचायतीचे सरपंचाने येथील भाजी-फळे विक्रेत्यांना एकमेकांपासून लांब बसून विक्री करणेबाबत सांगितले, बाजार म्हणल्यावर नागरिक हे पाळणार नाहीत याची जाणीव असतानाही आजचा बाजार हे गावातील नागरिकांना धोक्याच्या शुक्रवार ठरू शकते.जमावबंदीबाबत कारवाई नाही...

जमावबंदी मोडून भरविलेल्या बाजारावर पोलिस कारवाई निरुपयोगी ठरत असून, पोलिस राउंड मारून गेलेनंतर नागरिक पुन्हा गर्दी करीत आहेत. दरम्यान येथील सरपंच शिवाजी कदम यांना फोनवर संपर्क केला असता नागरिक सांगूनही ऐकत नाहीत. बाजर भरविणेसाठी कुणालाही सांगितले नाही. फक्त भाजी विक्रेते बाहेर बसून गर्दी करत होते तेव्हा त्याने बाजार कट्यावर बसून योग्य अंतर घेऊनच विक्री करावी व गर्दी टाळावी, नागरिक व भाजी विक्रेत्यांनी याचा चुकीचा अर्थ काढला, याबाबत आम्ही शिरूर तहसीलदार यांना पत्राद्वारे कळविणार आहोत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या