पेट्रोल पंपावर ग्राहक सुविधांचा वणवा...

Image may contain: one or more people
मांडवगण फराटा, ता. १२ एप्रिल २०२० (संपत कारकूड): फेडरेशन ऑफ पेट्रोल डीलर असोसिएशन यांनी दिलेल्या आदेश्याप्रमाणे सर्व पेट्रोलपंप संचालकांनी प्रत्येक ग्राहकांना पेट्रोल भरण्यास आल्यानंतर ९ सुविधा देणे बंधनकारक असताना ग्रामीण भागातील बहुतांश पंपावर या सुविधाच उपलब्ध होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.सध्या कोरोनाच्या धोक्यामुळे ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांनी पेट्रोल देण्यावर खूप नियंत्रण आणले आहे.निष्कारण गर्दी होऊ नये, अनावश्यक वाहने रोडवर भटकू नयेत म्हणून काही नियम केले आहेत.या नियमांचा फटका अत्यावश्यक सेवा देण्याऱ्या वाहनांना बसत आहे.फळे, भाजीपाला, दूध, मेडिकल यातील वाहने व त्यांचे मालक याना दैनंदिन पेट्रोलची गरज भासत आहे.आता पेट्रोल संचालकांनी नियम सांगितल्यावर ग्राहक हक्क आलाच.सुज्ञ ग्राहकांनी आपला हक्काची पायमल्ली होत असल्याची खंत व्यक्त केली असून, ग्रामीण भागात पंप चालकांकडून काय ? सुविधा देणे गरजेचे आहे ते पहा.पेट्रोल भरल्यास ग्राहकाला बिल मिळण्याचा अधिकार, कोणताही पेट्रोल पंप बील द्यायला नकार देवू  शकत नाही.ग्राहकाला पेट्रोलची क्वालिटी चेक करण्याचा आणि मोजण्याचा अधिकार, प्रत्येक पंपांवर वॉशरूमची व्यवस्था असली पाहिजे, यासाठी कोणताही चार्ज पडत नाही.


प्रत्येक पंपावर हवा भरण्याची फ्री सुविधा दिली पाहिजे.पंपावर फयर फायटर असले पाहिजे.अपघातात जखमी व्यक्ती पेट्रोल पंपातून फर्स्टएड बॉक्स घेऊ शकते.फसवणूक झाल्यास ग्राहकाला तक्रार करण्यासाठी तक्रार पेटी व रजिस्टर असले पाहिजे.तेलाच्या योग्य मोजमापासाठी ५ लिटरचे एक मापक असले पाहिजे.पाणी पिण्याची सुविधा प्रत्येक पंपावर असली पाहिजे.या सर्व सुविधा जर दिल्या नाहीत तर तक्रार करण्यासाठी पेट्रोल पंपावर उपलब्ध टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकता. 

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या