गोरगरीबांच्या मदतीला धावले लोखंडे कुटुंबीय...

Image may contain: 2 people, including Avinash Kale, people standing and outdoor
देवदैठण,ता.१४ मार्च २०२० (संदीप घावटे): देवदैठण (ता.श्रीगोंदा) येथील पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे व उद्योजक अतुल लोखंडे या दांपत्यांनी लॉकडाउनमुळे उपासमार होत असलेल्या येळपणे गटातील २० गावातील १ हजार ५०० कुंटुबांना सुमारे १० लाख रुपयांच्या जीवनावश्यक किराणा वस्तूंची भेट दिली.तसेच अनेक रुग्णांना औषधे घरपोच केली आहेत तसेच अनेकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.

  
श्रीगोंदा तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार महेंद्र माळी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ हिंगणी येथे करण्यात आला. लोखंडे यांची टीम दोन दिवसात घरोघरी जाऊन २० गावातील गरजू कुंटुबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.हा सर्व किराणा पॅकींग करणे व गरजूंपर्यत पोहचविण्याचे काम  पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, माजी सरपंच मंगल कौठाळे, तुषार लोखंडे, पत्रकार  दिपक वाघमारे, संतोष टिळेकर, माऊली शिंदे, सुरेश शिंदे, सोमनाथ वाखारे, नवनाथ शिंदे, बाळासाहेब कौठाळे, सतीश कौठाळे, सकलेन शेख, सतीश वाघमारे, अजित वाघमारे, मनेश गव्हाणे, प्रकाश साठे  आदींनी जबाबदारी पार पाडली .

विवाह इच्छुकांना मोफत नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ, खाली क्लिक करा...यावेळी www.shirurtaluka.com बोलताना श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी म्हणाले,लोखंडे दांपत्यांनी सुमारे दीड हजार कुंटुबांना जीवनावश्यक वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.हा उपक्रम स्तुत्य आहे.तसेच उदयोजक अतुल लोखंडे म्हणाले,कोरोनाचे संकट महाभयानक असून देश एका जागेवर उभा आहे. गरीब कुंटुबांतील लेकरांना दोन घास भरवावेत या भावनेने मदत केली आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या