'लॉकडाऊन' मध्ये वीजबिल 'ऑनलाईन' भरणे झाले सुकर

No photo description available.
बारामती, ता. १४ एप्रिल (प्रतिनिधी): कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे गेल्या २३ मार्चपासून महावितरणने वीजबिलांची छपाई व वितरण बंद केले आहे. मात्र महावितरणने मोबाईल अँप, वेबसाईट व 'एसएमएस'द्वारे वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिल मिळविणे व ते 'ऑनलाईन' भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.


बारामती परिमंडल अंतर्गत सातारा, सोलापूर व बारामती, दौंड, शिरुर, इंदापूर, पुरंदर व भोर तालुक्यातील (जि. पुणे) कृषी व अकृषक वर्गवारीतील २३ लाख ६५ हजार ७६३ (९२टक्के) वीजग्राहकांनी महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. लॉकडाऊनमध्ये या ग्राहकांना वीजबिलांची माहिती 'एसएमएस'द्वारे देण्यात येत आहेत.बारामती मंडलमधील सर्व वर्गवारीतील ५ लाख ८३ हजार ५४९ पैकी ५ लाख ३४ हजार ३९१ (९१.५७ टक्के) वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये बारामती विभाग- १ लाख ९६ हजार ५०७, केडगाव विभाग- १ लाख ९३ हजार ७७० आणि सासवड विभागातील १ लाख ४४ हजार ११४  वीजग्राहकांचा समावेश आहे.


बारामती मंडलमधील ऊर्वरित वीजग्राहकांना सुद्धा महावितरणच्या ९९३०३९९३०३ या क्रमांकावर 'एसएमएस'द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९९३०३९९३०३ क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून 'एसएमएस' केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ऍ़पद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.


याशिवाय वीजग्राहकांसाठी महावितरण मोबाईल ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना त्यांचा स्वतःच्या अनेक वीजबिल पाहणे व त्यांचा भरणा करण्याची सोय आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. हे मोबाईल अँप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अन्ड्राईड’, ‘विंडोज’ व ‘आयओएस’ या आँपरेटींग सिस्टीममच्या मोबाइलमध्ये हे अँप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्लेस्टोर,अँपल अँप स्टोरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या