डॉक्टरला कोरोनाची लागण झाली अन् 144 जण...

शिक्रापूर, ता. 16 एप्रिल 2020: शिक्रापूर येथील एका डॉक्‍टरला करोनाची लागण झाल्याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिरूर तालुक्‍यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर परिसरातील 144 जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.शिक्रापूर येथील सोनोग्राफी सेंटरला भेट देऊन तपासणी करीत सोनोग्राफी सेंटर सील केले असून परिसरात फवारणी करण्यास सुरूवात केली आहे. शिवाय, डॉक्टरने तपासणी केलेले रुग्ण शिक्रापूर परिसरातील आहेत. परिसरातील 144 जणांना 'होम क्‍वारंटाइन' करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.


दरम्यान, शिक्रापूर परिसरातील सर्व रस्ते पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. गावामध्ये येणाऱया वाहनांची नोंद करत करताना त्या वाहनावर फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मास्क न लावणाऱयांवर गुन्हे दाखल...
मास्क न लावता फिरणाऱया 12 जणांवर शिक्रापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवाय, नाकाबंदी दलम्यान रस्त्यावर विनाकारण फिरणाऱया नागरिकांवर कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱयांना उठाबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी दिली.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या