Video: विद्यार्थिनीने बनविले ग्रामस्थांसाठी मास्क!

वाघाळे, ता. 17 एप्रिल 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरी बनविलेले मास्क वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा घेत विद्यार्थिनी शिवानी संदीप धायबर हिने घरीच मास्क तयार करून गावातील नागरिकांना मोफत दिले आहेत. तिच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. शिवाय, कोरोनाला दूर ठेवण्यासाठी घरीच तयार करण्यात आलेले मास्क वापरण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला. यानंतर नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या शिवानीने तब्बल 200 मास्क घरीच तयार करून गावातील ग्रामस्थांना मोफत दिले आहेत.


शिवानी म्हणाली, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण टीव्हीवर पाहिले होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत घरी मास्क तयार करण्याचा निर्णय वडिलांना बोलवून दाखवला. मास्क बनविण्याचे प्रशिक्षण आईकडून घेतले. यानंतर मास्क बनवायला सुरवात केली. सुट्टी असल्यामुळे वेळेचा सदउपयोग करत मास्क तयार केले. गावातील ज्येष्ठ नागरिकांना मास्क देताना वेगळाच आनंद मिळाला.'


गावचे उपसरंपच दिलीप थोरात म्हणाले, शिवानीने मास्क तयार करत गावातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत दिले आहेत. घरी अजूनही ती मास्क बनवत असून, वाटत आहे. तिच्या स्तुत्य उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. एक विद्यार्थिनी पुढे येऊन गावासाठी काहीतरी करत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या