वाघाळे येथील रेशन दुकानात सर्वसामान्यांची फसवणूक...

No photo description available.
रांजणगाव गणपती, ता. १८ एप्रिल २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत नागरकींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने केंद्र सरकारने नागरीकांना दिलासा देण्यासाठी धान्य वाटप सुरू केले आहे. स्वस्त धान्य दुकाना मार्फत नागरीकांना रेशन कार्डव्दारे धान्याचे वाटप केले जाते. नागरीकांना मिळणारे हे धान्य संचारबंदीच्या काळात कुटूंबाच्या उदरनिर्वाहसाठी महत्वाचे समजले जाते. यामध्ये प्रत्येक नागरीकाला ५ किलो धान्य मोफत देण्याचा उपक्रम आहे. शिरूर तालुक्यात तांदुळ व गहू वाटप केली जात आहे. परंतु काही गावात फक्त दर मानसी ५ किलो तांदूळ देत आहेत.


वाघाळे (ता.शिरुर) येथील स्वस्त धान्य दुकानात कमी धान्य देत असल्याची तक्रार नागरीक करू लागले आहेत. वाघळे येथील स्वस्त धान्य दुकानात नागरीकांना कमी धान्य वाटप होत असल्याची तक्रार माजी सरपंच तुकाराम भोसले यांनी केली आहे. आपत्ती व्यवस्थापनातील अध्यक्ष कामगार तलाठी एस. एस. गायकवाड यांना या बाबत कोणतीच माहिती नसल्याने मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानदाराकडुन नागरीकांची फसवणूक होत असल्याचे दिसत आहे.


वाघाळे येथील एका कुटूंबाला नियमानुसार ३५ किलो धान्य मिळणे अपेक्षीत होते. मात्र दुकानदाराने त्यांना २० किलो धान्य दिले. या बाबत विचारणा केल्यावर या महिलेला संबधीत दुकानदाराच्या रोषाला सामोरे जावे लागले. महसूल विभागातील काही अधिकारी संबधीत दुकानदाराला पाठीशी घालत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कोरोनाने अगोदरच नागरीक भयभयीत झाले आहेत. त्यातून गावात आपत्ती व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे.


मात्र नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या जात नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. गावातील जेष्ठ नागरीक कुटूंबाचे केसरी रेशनकार्ड घेऊन दुकानात गेल्यावर तुम्हाला धान्य मिळणार नाही असे सांगत संबधीत रेशन दुकानदाराने त्यांना हाकलून दिल्याची तक्रार पुढे आली आहे. या बाबत कामगार तलाठी एस. एस. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता www.shirurtaluka.com शी बोलताना त्यांनी सांगितले कि, आज माझी सुट्टी आहे. पॅाझ मशीननुसार धान्य वाटप केले जाते. मला याबाबत जास्त माहिती नाही.
Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या