जुगार खेळताना ११ जण पोलिसांच्या ताब्यात...

शिंदोडी, ता . २० एप्रिल २०२० (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सगळीकडे लॉकडाऊन असताना तसेच सगळीकडे कलम १४४ लागु असताना निमोणे (ता.शिरुर) येथे काहीजण जुगार खेळत होते.त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अचानक छापा टाकला.त्यामुळे जुगार खेळणाऱ्या लोकांची पळापळ झाली.याबाबत पोलिसांनी ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असुन यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्याकडुन ५ लाख १८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


सविस्तर वृत्त पुढील पुढीलप्रमाणे निमोणे-गुनाट रोडवर कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिसांची गस्त चालु असताना एका ढाब्याजवळ बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास सुमारे १० ते १५ जण एकत्र बसलेले पोलिसांना दिसले.त्यांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते.त्यामुळे पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता.हे सर्वजण जुगार खेळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.पोलिसांना पाहुन त्यातील अनेक जणांनी पळ काढला.परंतु २ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.तसेच ११ जणांविरोधात भा द वि १८८,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ ब, भारतीय साथ रोग अधिनियम कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी एक स्विफ्ट कार सह ४ मोबाईल ताब्यात घेतले आहेत.


आरोपींची नावे पुढीलप्रमाणे १) सचिन हिंगे २) संतोष काळे ३) गोकुळ काळे ४) लहू काळे ५) राजू काळे ६) संतोष काळे ७) नवनाथ काळे ८) बाबा गव्हाणे ९) आक्रम पूर्ण नाव माहीत नाही सर्व रा. निमोणे  तसेच  १०) अनिल हांडे रा.करडे  ११) दिलीप हांडे रा.गुनाट यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस नायक थेऊरकर करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या