शिरूर तालुक्यातील 'ही' गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून...

पुणे, ता. 21 एप्रिल 2020: पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. शहराबरोबरच जिल्हाधिकाऱयांनी करोनाचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील एकूण 27 गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता जिल्ह्यातील इतर सर्व नागरिकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जारी केले आहेत. जिल्ह्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यातही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण आढळल्यास त्या भागात दिलेली सूट तत्काळ बंद करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.


प्रतिबंधित करण्यात आलेले क्षेत्र
पुणे महानगरपालिका - संपूर्ण पुणे शहराची हद्द, पिंपरी-चिंचवड महापालिका- संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराची हद्द, बारामती नगरपरिषद - संपूर्ण बारामती नगरपरिषद हद्द, हवेली तालुका - जांभूळवाडी, वाघोली, आव्हाळवाडी, बावडी, केसनंद, नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, सोनापूर, मालखेड, वरदाडे, जांभूळवाडी, कोळेवाडी, कोल्हेवाडी, नऱ्हे, खानापूर, लोणीकंद, उरुळीकांचन, पिसोळी, वडाचीवाडी, हांडेवाडी. शिरूर - विठ्ठलवाडी, शिक्रापूर. वेल्हा - निगडे, मोसे. भोर - नेरे. जुन्नर - डिंगोरे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या