शिरसगाव काटा येथे सोशल डिस्टंसिंग पाळून रक्तदान

Image may contain: one or more people, people sitting and shoes
शिंदोडी, ता. २१ एप्रिल २०२० (तेजस फडके): राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्याचे आरोग्यमंञी राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिरसगाव काटा (ता.शिरुर) येथे कोल्हाटीबुवा ग्रामविकास प्रतिष्ठान ने भोसरी येथील रेड प्लस ब्लड बॅंक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.युवकांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरास ग्रामस्थांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.


सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. या वेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.शिबिरात प्रवेश करण्यापुर्वी इच्छुकांना प्रथम सॅनिटायझर व मास्क देण्यात येत होते.त्यानंतर टप्प्या-टप्प्याने युवकांनी शिबिरात हजेरी लावत दिवसभरात सुमारे ७२ पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले.रक्तदान केल्यानंतर चहा,फळे,व प्रमाणपञाचे वाटप करण्यात आले.


या शिबिरासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कदम,जयदिप पवार,किरण काटे,सचिन आवारे,विलास काळे,गणेश शिंदे,काशिनाथ काटे यांनी परिश्रम केले.तर प्रदिप साळुंके,बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे,नरेंद्र माने,माणिक कदम यांनी विशेष सहकार्य केले.शरद जाधव हे दिव्यांग असुनही त्यांनी शिबिरात सर्वप्रथम सहभाग घेत रक्तदान केले. त्यांच्या या सहभागाबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या