सादलगावची यात्रा पोलीस बंदोबस्तात साजरी...

सादलगाव, ता. २२ एप्रिल २०२० (संपत कारकुड): चैत्र अमावस्येला भर दुपारी १२ वाजता पालखी घेऊन शेरणीचा कार्यक्रम तसेच संपूर्ण गावातील पुरुष मंडळी, आपल्या नातेवाईकांसोबत,डोक्यावर पेढे-नारळाची घमेली तसेच सगळे गावकरी रखरखत्या उन्हात मोठ्या भक्ती भावाने चालत आहेत हे दृश्य गेले अनेक वर्ष प्रत्येक जत्रेला अनुभवणारी गावकरी मंडळी मात्र करोना संसर्ग टाळण्यासाठी लॉक डाऊनमुळे घरातच थांबली होती.


सादलगाव (ता.शिरुर) येथील श्री बापुजीबुवा यात्रेचा पालखी मिरवणूक सोहळा आणि शेरणी वाटपाचा कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात अगदी मोजक्या भक्तांना घेऊन साजरा करावा लागला. बहुंतांश ग्रामस्थांनी घरात थांबूनच देवाला हात जोडले.गावातील नेते मंडळींनी गावातील मारुती मंदिरासमोर ठराविक अंतर ठेऊन ठीक १२ वाजता टाळ्या वाजवून लांबूनच दर्शन घेतले.ग्रामस्थांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शिरुर तसेच मांडवगण फराटा येथील पोलिसांनी चोख बंदोबस्थ ठेवला होता. काही ठिकाणी निष्कारण बाहेर येऊन गर्दी करण्याऱ्या नागरिकांना काठीचा प्रसादही दिला. त्यामुळे गावबंद करण्याचा प्रयत्न १०० टक्के बंद यशस्वी झाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या