शिक्रापूरमधील कोरोनाबाधिताचा अखेर मृत्यू...

शिक्रापूर, ता. 25 एप्रिल 2020: कोरोनाची संशयास्पद लक्षणे आढळल्यामुळे गुरुवारी (ता. 23) पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलेल्या शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका 40 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 24) मृत्यू झाला.
रुग्णाला सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळली होती. त्यामुळे त्याने येथील ग्रामीण रुग्णालयात 17 एप्रिल रोजी तपासणी करून घेतली होती. त्याच वेळी त्याची लक्षणे पाहून त्याचा नाकातील स्राव नमुना म्हणून डॉक्‍टरांनी पुण्यात तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल गुरुवारी (ता. 23) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दगावलेला रुग्ण हा मूळ शिक्रापूरचा रहिवासी नाही. मात्र. तो परिसरातील खासगी कंपनीत कामगार होता. या रुग्णाचा एक जवळचा नातेवाईक व शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे सात कर्मचारी यांना "हायरिस्क' म्हणून तातडीने होम क्वारंटाइन केले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.


याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने शिक्रापूर 'हायरिस्क' असल्याचे सांगूनही नागरिक गंभीर नसल्याने ही अशी घटना घडल्याचे जिल्हा आरोग्य विभागाचे म्हणणे असून, शिक्रापूर व सणसवाडी हे "रेड झोन'मध्ये आहे. त्यामुळे यापुढे सोशल डस्टन्सिंगबाबत आणखी कडक पावले उचलावी लागणार आहेत.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या