केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य

No photo description available.पुणे, ता. 25 एप्रिल 2020 : लॉकडाऊन कालावधीत मे आणि जून महिन्‍यांकरिता अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारकांना 25 एप्रिलपासून रास्‍तभाव धान्‍य दुकानातून सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करण्‍यात येणार आहे, अशी माहिती जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.


आजपासून (ता. 25) मे महिन्‍याचे धान्‍य दुकानातून उपलब्‍ध होणार असून, गहू 8 रुपये प्रति किलो, तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने प्रति व्‍यक्‍ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ वितरित  करण्‍यात येणार आहे.अंत्‍योदय व अन्‍नसुरक्षा लाभार्थ्‍यांना मे महिन्‍याचे धान्‍य वाटप 5 मे पासून करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. रास्‍तभाव दुकाने पोलिसांच्‍या सूचनांप्रमाणे पूर्ण वेळ सुरु राहतील, असे जिल्‍हाधिकारी राम यांनी स्‍पष्‍ट केले. रास्‍तभाव धान्‍य दुकानांत पुरेसा धान्‍यसाठा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेला आहे. या धान्‍याचे वितरण लाभधारकांना 31 मे पर्यंत करण्‍यात येणार आहे. त्यामुळे धान्‍य घेण्‍यासाठी गर्दी करु नये, असे आवाहन त्‍यांनी केले.रेशनकार्डधारकांसाठी हेल्‍पलाईन

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या