मांडवगण फराटा येथील रेशन दुकान सील...

Image may contain: one or more people, people standing and outdoor
मांडवगण फराटा,ता. २८ एप्रिल २०२० (संपत कारकुड): मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील रेशन दुकानातील अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेचा ४८ पोती गहू तसेच तांदूळ आणि मोफत वाटपाचा २३ कट्टे तांदूळ विना वाटप जवळ बाळगून वाटप केला नसल्याचे अचानक केलेल्या पाहणीत निष्पन्न झालयामुळे शिरुरचे  पुरवठा अधिकारी ज्ञानदेव यादव तलाठी दिपक गांगुर्डे यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत हे रेशनिंग दुकान जागेवरच सील केले.


मांडवगण फराटा येथे गेल्या  २० वर्षांपासून सुनीता रमेश कटारिया या रेशन दुकान चालवीत आहेत. सध्या लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना दिला जाणारा अंत्योदय व अन्न सुरक्षा योजना तसेच मोफतचा गहू आणि तांदूळ वाटप सर्वाना चालू आहे. परंतु तांदूळ वाटपासाठी मोफत तांदूळ मानसी ५ किलो वाटण्याबाबत सूचना असताना हा तांदूळ फक्त कार्डवर आधार सिडींग असलेल्या व्यक्तीलाच वाटण्यात आल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबातील सदस्य असूनही तांदूळ मिळाला  नाही अश्या अनेक तक्रारी तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे गेल्या होत्या.परंतु तालुका पुरवठा अधिकारी कारवाई करीत नव्हते. गोरगरिबांच्या घासावर डल्ला मारला जात होता. एकाचवेळी आलेले हे धान्य तसेच ठेवले होते. धान्य नियमित न उचलणाऱ्यांचे धान्य हिशोबाला दाखविले जात नव्हते. हे सर्व पद्धतशीरपणे करून काळा बाजार होत असलयाची बाब समोर आली आहे. आतापर्यंत एकदा या दुकानदारांवर कारवाई झाली होती. परंतु त्यावेळेस हा दुकानदार सुटला होता. तक्रार करून वाईट कोणी व्हायचे हा प्रश्न प्रत्येक लाभार्थीचा होता. धान्य तर आले परंतु नागरिकांना धान्य मिळत नव्हते. कारवाई झालेले दुकानदार महा-ई-सेवा केंद्रही चालवीत आहे.रेशन दुकान तक्रारीची संख्या मोठी...
तालुकाभर सर्वत्र रेशन वाटप बायोमेट्रिक केले आहे. या वाटपामध्ये कुटुंबामधील व्यक्तीचा अंगठा घेऊन धान्य वाटप केले जाते. परंतु प्रत्येक वेळेस अंगठा मॅच होणे मोठे जिकरीचे होत आहे. काही वेळेस तर अंगठा बसतच नाही म्हणून नागरिकांवर माघारी जाण्याची वेळ अली आहे. घरातील कोणत्याही दोन व्यक्तीचा अंगठा घेऊन धान्य वाटप केले जाते. परंतु महिला मजूर व शेतकरी यांच्या हाताच्या अंगठयाच्या रेषांची झीज झाली असलयामुळे धान्य मिळत नाही.अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु यावर प्रशासन पातळीवर कोणतीच उपाय योजना केली नसलयामुळे दुकानदारांचे चांगलेच फावते आहे. रेशन वाटपामध्ये पुन्हा एकदा बदल हवा आहे अशी मागणी नागरिक करीत आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या