डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय औषधे नाहीत; कारण...

शिरूर, ता. 29 एप्रिल 2020: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुका व शिरूर शहरात डॉक्टरांच्या अधिकृत चिठ्ठी शिवाय कुठलीही ताप खोकल्याचे औषध देऊ नये अन्यथा संबंधित मेडिकल दुकानदारावर आपत्ती व्यवस्थापना कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी दिली.

याबाबत शिरूर शहरात शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व शिरूर तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी व शिरूर चे पोलिस निरीक्षक यांनी या आदेशाची अंबलबजावणी आपल्या स्तरावर करावी यासाठी तहसीलदार लैला शेख यांच्यावतीने पत्र देण्यात आले आहे. पुणे शहरामध्ये यापूर्वीच याची अंमलबजावनी सुरू झाली आहे.
शिरूर तालुक्यात कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले असून, कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण पाहता, कोरोना आजाराचा संसर्ग व पादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे, प्रतिबंधात्मक उपायोजना करणे आवश्यक आहे. परंतु, काही नागरिक ताप खोकला लक्षणे दिसताना डॉक्टरांची अधिकृत चिठ्ठी न आणता ताप खोकल्याची औषधे मेडिकल दुकाणा मधून घेत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले. ताप खोकला अशी लक्षणे असलेला व्यक्ती डॉक्टरांच्या विनापरवानगी ही औषधे मेडिकल दुकानातून घेत असून यामुळे covid-19 या रोगाचे निदान होऊ शकत नाही. त्यामुळे मेडिकल दुकानातून ताप खोकल्याची औषधे डॉक्टरांच्या विनापरवानगी शिवाय देण्यात येऊ नये, मेडिकल दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ताप खोकल्याची औषधे दिले असे निदर्शनास आले तर त्या दुकानदारांवर आदेशाचे उल्लंघन केले व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड विधान 1860 कायद्याचे कलम 188 प्रमाणे दंड न्याय कारवाई करण्यात येणार असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, शिरूर शहर नगरपरिषद, शिरूर तालुक्यात तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरूर पोलिस स्टेशन संबंधित अधिकाऱ्यांनी या नियमाची मेडिकल दुकानदारांकडून काटेकोर पालन करून घेण्यात यावे अशीही सूचना देण्यात आली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या