म्हणुन आण्णापूर मधील काहीजण

Image may contain: 1 person, closeup, text that says 'Home Quarantine'
शिरुर, ता. २९ एप्रिल २०२० (मुकुंद ढोबळे) : आण्णापुर (ता.शिरुर) येथील काही व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉक डाऊनच्या काळात कोरोना बाधित क्षेत्राशी संपर्क येणाऱ्या व्यक्तींना सतर्कता व काळजी म्हणून होम क्वारंटाइन केले असून, शिरुर पंचक्रोशीतील काही व्यक्तींना ही होम क्वारंटाइन केले असल्याचे शिरूर तालुका प्राथमिक रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे.

याबाबत अण्णापुर आणि शिरुर पंचक्रोशीतील नागरिकांनी घाबरुण जाण्याचे कारण नसून केवळ आपल्या सर्वांच्या हितासाठी ही कारवाई असल्याचे सांगून, या भागातील अनेक शेतकरी नागरिक आपला भाजीपाला घेऊन वाघोली, शिक्रापूर, लोणीकंद या भागात विक्रीसाठी जात होते. परंतु ही गावे आता कोरोनाबाधित क्षेत्रात येत असल्याने अशा क्षेत्रांशी संपर्क येणाऱ्या भाजीविक्रेते फळविक्रेते आणि इतर व्यक्तींना स्वतःच्या व काळजी म्हणून शिरूर तालुका प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आदेशाने  प्राथमिक आरोग्य केंद्र करडे येथील आरोग्य पथकाकडुन अण्णापूर, रामलिंग पंचक्रोशीतील काही ही नागरिकांना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे.

या व्यक्तींचा कुठल्याही कोरोना बाधित भाजी विक्रेते किंवा व्यक्तीशी त्याचा संबंध आलेला नसून, वाघोली येथे भाजीपाला व्यापारी कोरोना बाधित सापडलेला नाही.परंतु या गावात काही बाधित नागरिक सापडले आहे. म्हणून या बाधित क्षेत्राशी या नागरिकांचा संपर्क आलेला आहे म्हणून ही कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही हे फक्त आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे. सतर्कता व काळजी म्हणून ही कार्यवाही केली असल्याचे वैद्यकिय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.

नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, बाहेर जाताना मास्क चा वापर करा.सोशल डिस्टसिंगचां वापर करा दोन व्यक्तीत एक मीटर अंतर ठेवा. साबण व पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवा, आपला घर व परिसर स्वच्छ ठेवावा, अफवांवर विश्वास ठेवू नका अशा सूचनाही ही तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी देऊन घरीच थांबावा आपली व आपल्या स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या असा सल्लाही आण्णापूर, शिरूर पंचक्रोशीतील नागरिकांना दिला आहे. शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी आज आण्णापूर  ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला.

आण्णापूर गाव ३० एप्रिल पर्यंत पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात आले असून, कुठल्याही बाहेरच्या नागरिकांना गावामध्ये प्रवेश दिला जात नाही. पुणे, वाघोली ,शिक्रापूर या परिसरातून कुठल्याही भाजीपाला, फळे घेणाऱ्या व्यापाऱ्यांना अण्णापूर गावात येण्याचे बंदी घालण्यात आली आहे.गावामध्ये इतर बाहेर ठिकाणाहून आलेल्या काही नागरिकांनाही ही आण्णापूर सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन वतीने होम  क्वारंटाइन केले असल्याचे सांगितले.
   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या