पोलिसांजवळ आला अन् म्हणाला काठी देता का..

शिरूर, ता. 30 एप्रिल 2020 (PoliceKaka): कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना पोलिस, जवान डोळ्यात तेल घालून अहोरात्र नागरिकांचे संरक्षण करताना दिसतात. मात्र, काही जण पोलिसांशी हुज्जत घालत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.रामलिंग रोडवरील तपासणीनाक्‍यावर बंदोबस्त बजावणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानास मारहाण व पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या चौघा तळीरामांविरूद्ध शिरूर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
अमोल अशोक पवार (वय 22) व राहुल अशोक पवार (वय 27, रा. कैकाड आळी, शिरूर) यांना अटक केली तर पळून गेलेल्या इतर दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. रामलिंग रोडवरील चेकपोस्टवर मंगळवारी (ता. 28) सायंकाळी हा प्रकार घडला. चेकपोस्टवर अमोल दारूच्या नशेत आला व तुमची काठी जरा देता का, म्हणून घोलप यांची चेष्टा मस्करी करू लागला. म्हणून त्यांनी अमोलला हाकलून लावले. त्याचा राग आल्याने तो आपला भाऊ राहुल व इतर दोघांना घेऊन आला. त्या चौघांनी घोलप यांना मारहाण केली. तेथे आलेल्या पोलिसांशीही या चौघांनी हुज्जत घातली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या