शिरूर शहरात रात्रीच्या वेळी हळूच प्रवेश करतात...

शिरूर, ता. 30 एप्रिल 2020 (PoliceKaka): शिरूर शहरात प्रवेश करणाऱ्या 21 नागरिकांची माहिती मिळाल्यावर शिरुर नगर परिषद व शिरूर ग्रामीण रुग्णालयाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वरनटाईन केले आहे. तसेच या नागरिकांवर ग्रामीण रुग्णालयाची नजर रहाणार असल्याचे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.शिरूर शहरात रात्रीच्या वेळी विविध भागातील नागरिक गुपचूप प्रवेश करीत आहेत. शहरात गुपचूप प्रवेश करणारे 21 नागरिक आढळले असून, या सर्व नागरिकांना कवरांटाईन केले आहे. हे नागरिक गुजरात राज्यातील वाफी, पुणे, मुंबई, करमाळा व इतर ठिकाणाहून शहरात आले आहेत. या नागरिकांची माहिती मिळाल्यानंतर शिरूर नगर परिषदेच्या वतीने माहिती घेऊन त्यांना क्वारंटाईन केले आहे.शिरूरमध्ये पुणे, मुंबई, व इतर ठिकाणाहून रात्रीच्या वेळी अनेक जण शहरात आपापल्या नातेवाइकांकडे येत आहेत. हे नागरिक संसर्ग बाधित क्षेत्रातून येत आहेत. शहरातील नागरिकांनी आपल्याकडे कुठल्याही नातेवाईक पाहुण्यांना बोलू नये, कोणी आपल्याकडे आले तर त्याची माहिती त्वरित शिरुर नगर परिषद द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय, माहिती लपवणाऱ्या नागरिकावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा श्री. रोकडे यांनी दिला आहे.सॅनिटायझरचे सॅंपल घेण्याचा बहाणा केला अन्...

सॅनिटायझरचे सॅंपल घेण्यास आल्याचे सांगून मुंबईहून शिरूरला आलेल्या चौघांना शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्याच्याकडे ते आले होते, त्याच्याच निवासस्थानी त्यांना क्‍वारंटाइन करण्यात आले. त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ जीप पोलिसांनी जप्त केली. देवेंद्र दिनेश दुबे, राजेश कुमार नाडर, दिनेश रामदुलाब दुबे, दीपक बाळकृष्ण साळवे (सर्व रा. गोरेगाव, मुंबई) यांच्यासह राजेंद्र रमेश परदेशी (रा. शिरूर) यांच्याविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील चौघे मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास स्कॉर्पिओ जीपमधून (एमएच 02, सीएच 3177) परदेशी यांच्या घरी आले होते. याबाबत आसपासच्या नागरिकांनी नगरपरिषदेला कळविल्यावर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, "मुंबई महापालिकेकडून आम्हाला सॅनिटायझरची ऑर्डर मिळाली असून, शिरूरमध्ये सॅनिटायझर मिळत असल्याने त्याचे सॅंपल घेण्यासाठी आलो आहोत,' असे त्यांनी सांगितले. याबाबत संशय आल्यावर पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांच्याकडील जिल्ह्याबाहेर जाण्याचा परवाना सक्षम अधिकाऱ्याने दिला नसल्याचे तसेच त्यांची ओळखपत्रे अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा; तर परदेशी यांच्याविरुद्ध त्यांना बेकायदा आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या