शरद भोजन योजने अंतर्गत ५ गावांमध्ये धान्य वाटप

तळेगाव ढमढेरे, ता. ४ मे २०२० (एन बी मुल्ला): शरद भोजन योजने अंतर्गत ५ गावात १ हजार ३६९ कुटुंबांना २१ हजार ३५० किलो तांदूळ व गहू वितरण  करण्याचे काम शुक्रवार (दि.१ मे) पासून चालू करण्यात आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील तलाठी ज्ञानेश्वर बराटे व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांनी दिली.कोरोना व्हायरस प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केल्यामुळे बाहेरगावच्या अनेक लोकांवर रेशन संपल्याने उपासमारीची वेळ आली होती. ज्यांना स्थानिक रेशन धान्य दुकानात रेशनचे धान्य मिळत नाही अशा लोकांसाठी शरद भोजन योजनेअंतर्गत शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन माहिती भरून अशा लाभार्थींचे खाते काढण्यात आले असून अशा कुटुंबप्रमुखांची लाभार्थी यादी मध्ये नावे आलेली आहेत.लाभार्थीना शासनाने तात्काळ रेशन  वाटपासाठी उपलब्ध करून दिले आहे.शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे येथील १ हजार १३९ कुटुंबातील ३ हजार ३४५ व्यक्तींना याचा लाभ मिळाला आहे. विठ्ठलवाडी येथे १४२ कुटुंबातील ६२७ व्यक्तींना, शिक्रापूर येथे ५७ कुटुंबातील १८३ व्यक्तींना, निमगाव म्हाळुंगी येथे २३ कुटुंबातील ९२ व्यक्तींना तर पिंपळे जगताप येथे ८ कुटुंबातील २३ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या ५ गावातील लाभार्थींना तांदूळ १२ हजार ८१० किलो, गहू ८ हजार ५४० किलो असे एकूण १ हजार ३६९ कुटुंबातील ४ हजार २७० व्यक्तींना २१ हजार ३५० किलो तांदूळ व गव्हाचे वितरण सध्या करण्यात येत आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या