शिरुर पोलिसांनी गावाला निघालेल्या कामगारांना रोखले

Image may contain: one or more people, crowd and outdoor
शिरुर, ता. ४ मे २०२० (मुकुंद ढोबळे): रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कारेगाव, रांजणगाव, ढोकसांगवी परिसरातील शेकडो परप्रांतीय कामगारांनी रविवार (दि ३) मे रोजी अचानक रात्रीचा फायदा घेत पायी चालत आपल्या गावी जाण्यासाठी निघाले असता शिरुर जवळ शिरूर पोलिसांनी त्यांना अटकाव करून थांबवले. यामुळे पोलीस महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली.एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगार रस्त्यावरून निघाल्याने या कामगारांना थांबवण्यासाठी प्रशासनाची दमछाक झाली.शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी मोबाइल द्वारे या कामगारांना विनंती करून त्यांना त्यांच्या प्रांतात पाठवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्यानंतर कामगार शांत झाले.परंतु या कामगारांची थांबण्याची तयारी नव्हती परंतु पोलिस प्रशासनाने जास्ती कुमक मागून या सर्व नागरिकांना याठिकाणी थांबवले यात काळी महिलांचाही आणि लहान मुलांचाही समावेश होता.त्यानंतर घटना स्थळी शिरूरचे तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी याठिकाणी येऊन या परप्रांतीय कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर रात्री १:३० वाजता शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी मोबाईल साहाय्याने या नागरिकांशी संवाद साधून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितल्यावर अखेर हे परप्रांतीय कामगार शिरूर येथे थांबण्यास तयार झाली. त्यानंतर शिरूरच्या तहसिलदार लैला शेख पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी मयुर लॉन्स तर्डोबाचिवाडी, न्हावरे फाटा येथील मंगल कार्यालयात यातील जवळपास साडेचारशे कामगारांची राहण्याची व्यवस्था केली तर उरलेले कामगार ते राहत असलेल्या कारेगाव ढोकसांगवी या परिसरात पुन्हा पाठवण्यात आले. रात्री या कामगारांच्या भेटीला बारामती विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना व दौंड विभागाच्या पोलीस उपाधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.


त्यानंतर आज सकाळी शिरूरचे आमदार अशोक पवार , प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख यांनी या कामगारांची भेट घेतली. शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांनी या सर्व कामगारांची राहण्याची की सकाळी नाश्ता जेवण त्यांना लागणारे पाणी या सर्वांची व्यवस्था केली होती तर शिरूर पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या वतीने या सर्व कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या