शिरुर तालुक्यात तळीरामांनी केले शिस्तीचे पालन

Image may contain: one or more people, people walking and outdoor
शिरुर, ता. ५ मे २०२० (प्रतिनिधी): राज्य सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिल्याने गेल्या दीड महिन्यापासून घरात बसुन कंटाळलेले तळीराम अचानक बाहेर निघाल्याने दारुच्या दुकानांपुढे गर्दी झाली.त्यामुळे सगळीकडे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला.त्यामुळे तळीरामांना अनेक ठिकाणी पोलिसांच्या काठीचा "प्रसाद" खावा लागला.शिरुर तालुक्‍यात आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी नागरिकांनी बेशिस्तीचे दर्शन घडवले असताना येथील "तळीराम" मात्र शिस्तीत होते.त्यामुळे शिरूर शहरात नागरिक बेशिस्तीत तर तळीराम शिस्तीत अशी म्हणण्याची वेळ आली आहे.याची चर्चा आज शिरूर शहरामध्ये सुरू होती.शिरूरच्या सर्व व्हाट्सअप, फेसबुक ग्रुप वर, टिकटॉक वर शिरुरच्या तळीरामांच्या लांब लागलेल्या लाईनचे व्हिडिओ पोस्ट होत होते. तळीरामांच्या या सोशल डिस्टन्स गर्दीला पाहण्यासाठी शहरातील अनेक नागरिक येत होते.कोरोना व्हायरसमुळे गेल्या दीड महिन्यापासून दारूची दुकाने बंद होती. त्यामुळे तळीरामांची मोठी तारांबळ होत होती.त्यात आज दारूची दुकाने सुरू होणार असल्याने तळीरामांनी दुकानासमोर केली गर्दी होती.शिरूर शहरात एकमेव वाईन शॉपचे दुकान असून येथे आज दुकान उघडल्यापासून तळीरामांची एकच गर्दी झाली. मात्र, तळीरामांनी यावेळी शिस्तीचे आणि सोशल डिस्टन्सचे कडेकोट पालन केले. त्यामुळे शिरुर शहरात नागरिकांच्या बेशिस्तीचे तर तळीरामांच्या शिस्तीचे दर्शन आज शहरातील नागरिकांना झाले.

शिक्रापूर येथे मद्य विक्रीची दुकाने सुरु होताच तळीरामांची दुकानासोमर तळीरामांची गर्दी केली. तळीरामांनी लावलेल्या रंगामुळे सोशल डिस्टंशिंग नियमांचा फज्जा उडाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गर्दी आटोक्यात आणण्यास सुरवात केली, तर शिक्रापूर येथील पाबळ चौक येथे तळीरामांची गर्दी झाल्याची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी नागरिकांना ठराविक अंतर ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या