पीडीएफ बातम्यांची फाइल फॉरवर्ड करा अडचण नाही

Image may contain: text that says 'PDF'
शिरुर, ता. ५ मे २०२० (तेजस फडके): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून घरोघरी वृत्तपत्र वितरणासाठी बंदी घालण्यात आली आहे.अशा परीस्थितीत नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्यासाठी वृत्तपत्र संस्थातर्फे दररोज प्रकाशित केले जाणारे वृत्तपत्र हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडीएफ स्वरूपात प्रसारित करण्यात येत आहे.मात्र नुकतेच अशाप्रकारे पीडीएफ प्रसारित करणे हा गुन्हा असल्याची चर्चा सोशल मीडियावर घडत आहे. त्यामुळे अनेकांकडून अशा प्रकारची फाइल प्रसारित न करण्याबाबत आवाहन केले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी सद्यस्थितीत वृत्तपत्र संस्थाकडून वृत्तपत्राच्या पीडीएफ फाइल अधिकृतपणे पाठविण्यात येते. तसेच या फाइलमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड न करता ती पाठविणे हा गुन्हा ठरत नाही. यामुळे वृत्तपत्राची पीडीएफ फाइल प्रसारित करणे हा कोणत्याही प्रकारे गुन्हा ठरत नसून, नागरिकांनी याबाबतच्या अफवांना बळी पडू नये,असे आवाहन पुण्याच्या सायबर गुन्हे विभागाकडून करण्यात आले आहे.मात्र, योग्य माहितीचा प्रसार व्हावा, यासाठी वृत्तपत्र संस्था अथवा संस्थांच्या प्रतिनिधींकडून अशाप्रकारे फाइल प्रसारित करणे.तसेच या फाइलमध्ये कोणतीही छेडछाड न करता, धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे मजकूर न घालता ही फाइल प्रसारित करणे हा गुन्हा नसल्याचे सायबर गुन्हे विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही वृतपत्र संस्थांकडून केले जात आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या