पुरवठा अधिकारी करतात दिखाऊ स्वरुपाची कारवाई

Image may contain: text that says 'राजकीय टाकून मिटवत होते परंतु मध्ये असताना जे प्रधानमंत्री कल्याण योजना सदस्याला पाच किलो दिले अंत्योदय योजनेतील प्राधान्य कुटुंबातील नियमानुसार जे आवश्यक होते देता मोफत सदस्यांना देता अशा 77 लोकांच्या वाटपामध्ये कमी दिलेल्या निदर्शनात आले अंत्योदय देण्यात धान्य ही कमी प्रमाणात दिले गेल्याचे निदर्शनात आले त्यानुसार त्याबाबत दाखल केली होती महसूल केली तक्रारीची चौकशी यांनी आवश्यक असलेल्या त्यापेक्षा कमी धान्य वाटप केलेले दिसून संबंधित दुकानदार यांनी कर्तव्यात केलेले झाले आहे सील आले आहे परंतु व्यक्तीवर कुठल्याही करण्यात सदर दुकानदार राजकीय दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या आहे गुंडांकडून सदर मागे घेण्यासाठी तंत्र आहे त्याच्यामुळे जीवितास त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात ही'
मांडवगण फराटा, ता. ५ मे २०२० (संपत कारकुड): सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेल्या धान्याचे योग्य वाटप केले नसल्यामुळे मांडवगण फराटा (ता.शिरुर) येथील सुनीता रमेश कटारिया यांचे रेशन दुकान शिरुर पुरवठा अधिकार ज्ञानेश्वर यादव यांनी (दि. २७ एप्रिल) रोजी जागेवरच सील केले होते.परंतु या दुकानदाराने केलेल्या घोटाळ्याची चौकशी पुरवठा विभागाने अद्याप केली नसल्यामुळे सदर दुकानदारावर झालेली कारवाई फक्त दिखाऊ स्वरूपाची होती का...? अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.मांडवगण फराटा येथील दुकानदाराने कोरोनाच्या संकट काळात जनतेला वाटपासाठी दिलेला एकूण ६५ गोणी गहू आणि तांदूळ वाटप न करता दडपण्याचा प्रयत्नात केला. तसेच एका व्यक्तीस ५ किलो तांदूळ देण्याचे आदेश असताना काहींना ते ४ किलो देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे हे दुकान सील करण्यात आले.परंतु कारवाई करून १० दिवस उलटले तरी अद्याप पुढील चौकशी करुन कारवाई करण्यास तहसीलदार जाणीवपूर्वक वेळ घालवीत असल्याची सार्वजनिक तक्रार गावातील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा भोसले तसेच सुनील चव्हाण यांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे ऑनलाईन केली आहे.तपासात दोषी आढळ्यास दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे अधिकार तहसीलदार याना असतानाही, कारवाई का केली जात नाही, कारवाई करण्यास अधिकारी का कचरतात, दुकानदाराला वाचवण्यासाठीच हा वेळ काढूपणा केला जात आहे. अश्या अनेक शंका गावभर निर्माण झाल्या आहेत. कारवाई संबंधात पुरवठा विभागातील पुरवठा अधिकारी शिंदे मॅडम यांना फोन केला तर त्यांनाहि कारवाईबाबत काहीच माहिती देता आली नाही. ज्या पुरवठा अधिकाऱ्यांनी हि कारवाई पार पाडली त्यांचा फोन लागत नाही. तहसीलदार मॅडम लैला शेख याही फोन उचलत नाहीत. म्हणजे सध्या जनतेचे हे सर्व सेवक नॉट रिचेबल आहे.


पुरवठा विभागाचे अधिकारी करतात दुर्लक्ष...?
शिरुर तालुक्यात रेशन वाटपामध्ये अनेक गावात अजुनही घोटाळा होत आहे.रेशन वाटप न करता मशीनवर परस्पर लाभार्थ्यांचे अंगठे घेणे, धान्य दिल्यास पावती न देणे, तसेच लाभार्थ्यांच्या याद्यांची अदलाबदल करणे, अश्या अनेक तक्रारी रेशन दुकानदारांच्या विरोधात येत आहेत.तसेच सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेल्या धान्याचे योग्य वाटप झाले नसल्याची गंभीर बाब समोर येत असताना कारवाई होत नाही. तालुकयातील अनेक दुकाने अशी आहेत कि, जेथे पुरवठा निरीक्षकच अद्याप पोचले नाहीत. प्रत्येक दुकानात नागरिकांच्या काहींना काही समस्या आहेत.त्या सोडविण्यास पुरवठा विभाग अपयशी ठरत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या