तळेगाव ढमढेरे येथे माय-लेकराची आत्महत्या की...

तळेगाव ढमढेरे, ता. 6 मे 2020 (PoliceKaka): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) मोहन मळा येथील शेतकरी कुटुंबातील माय-लेकराचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृत्यूबाबत कारण समजू शकलेले नसून, पोलिस तपास करत आहेत.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे येथील मोहन मळा येथील राहत्या घरात सुंदराबाई बाळासाहेब जेधे (वय 60) व मुलगा जितेंद्र बाळासाहेब जेधे (वय 44) या माय लेकराने घरातील लोखंडी हुकाला मंगळवारी (ता. 5) गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबती माहिती समजल्यानंतर घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. आई व मुलाचे दोघांचेही मृतदेह शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री आणण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून, पुढील तपास सुरू आहे.दरम्यान, जितेंद्र जेधे हे प्रगतिशील शेतकरी होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. आई व मुलाच्या आत्महतेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दोघांची आत्महत्या की अन्य काही कारण आहे, याबाबतची माहिती पुढे आलेली नाही.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या