तळीरामांसाठी दारूची दुकाने सुरु झाली पण...

शिरूर, ता. 7 मे 2020 (PoliceKaka): राज्य सरकारने आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी राज्यातील दारूच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. यामुळे दारूच्या दुकानासमोर तळीरांमांनी लांबच लांब रांगा लावून दारू मिळवली. पण, यामुळे घरगुती हिसांचारामध्ये वाढ होऊ लागली आहे. दारुची दुकाने सुरू झाल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली.
देशभरात दारूच्या दुकानांसमोर गर्दी झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून तळीरामांसाठी दारू किती प्रिय आहे, हे पाहायला मिळते. भर उन्हात माणूस उभा राहू शकत नाही. तिथे हे तळीराम अगदी शिस्तीत उभे असल्याचे पाहायला मिळते. पण, दारूची दुकाने सुरु झाल्याने घरातील महिलांवरील अत्याचारात वाढ होत असल्याची सूर महिला वर्गातून निघत आहे. दारूसाठी पैसे न दिल्यामुळे पत्नीला मारहाण झाल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.गोरगरीब म्हणणारे, अन्नधान्य किट घेणारे, गरिबीची आव आणणार अनेक जण दारू घेण्यासाठी रांगेत उभे असल्याचे दिसत होते. मद्यविक्रीसाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर 43 कोटी 75 लाख रुपयांची दारू विक्री झाली आहे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य शासनाने 3 मे 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. मद्यविक्रीसाठी सशर्त परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत अंदाजे 12.50 लाख लिटर दारुची विक्री झाली आहे. याची क़िंमत साधारण 43 कोटी 75 लाख रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली. गेल्या 40 हून अधिक दिवसांपासून सर्व कामं बंद असल्याने आर्थिक धोका निर्माण झाला आहे. लोकांच्या हाताला काम नसल्याने भविष्यात पैशांची अडचण निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दरम्यान, राज्यात 24 मार्च, 2020 पासुन राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 X 7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक - १८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक - ८४२२००११३३.हा असून हा ई-मेल - commstateexcise@gmail.com आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या