लॉक डाऊनमुळे अडकलेले २१ विद्यार्थी हिमाचल प्रदेशला रवाना

तळेगाव ढमढेरे, ता. ७ मे २०२० (एन बी मुल्ला): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील जवाहर नवोदय विद्यालय हे मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत चालविण्यात येत असून सध्याच्या लॉक डाऊनमुळे हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील विद्यार्थी २२ मार्च पासून येथे अडकले होते. त्यामुळे येथील जवाहर नवोदय विद्यालयात अडकलेल्या  हिमाचल प्रदेशातील २१ विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेशला पाठविण्यात आल्याची माहिती प्राचार्य टी.एम.नायर तसेच चंद्रशेखर कदम यांनी दिली.
 मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांच्यावतीने देशभरात ६९० निवासी नवोदय विद्यालये चालविण्यात येत असून त्यापैकी १४९ विद्यालयात परराज्यातून माईग्रेशन करिता शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी गेल्या २२ मार्च २०२० पासून अडकले आहेत. पिंपळे जगताप(ता. शिरूर) या नवोदय  विद्यालयाचा देखील त्यात समावेश असल्याने या विद्यालयात हिमाचल प्रदेश मधील सोलन जिल्यातील २१  विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले होते.


नवोदय विद्यालय समिती मुख्यालय नवी दिल्ली व भारत सरकारच्या आदेशानुसार परराज्यातून आलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना हिमाचल प्रदेश सोलन येथे पाठवण्याची  जवाबदारी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य  टी.एम.नायर व विद्यालयाचे शिक्षक चंद्रशेखर कदम यांनी घेतली होती. प्रवासासाठी शासनाच्या नियमानुसार जिल्हाधिकारी,पुणे यांच्याशी संपर्क करून प्रवास करण्याकरिता हिमाचल सरकारचे  ना हरकत प्रमाणपत्र व पुणे जिल्हाधिकारी यांचे अनुमती पत्र प्राप्त झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. दोन शिक्षकांचे सोबत या २१ विद्यार्थ्यांना बसमधून मंगळवार (दि.५ मे) रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांना हिमाचल प्रदेशात पाठवण्यात आले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या