शिरुर तालुक्यात आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह

No photo description available.
शिरुर , ता. ८ मे २०२० (प्रतिनिधी): शिरुर तालुक्यामध्ये शिक्रापुर, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे तसेच विठ्ठलवाडी या गावांमध्ये कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण सापडले असुन आसपासच्या परीसरात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील १० ते १५ गावांसह शिरुर तालुका हादरला आहे. तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.शिरुर तालुक्यात आढळुन आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता ५ वर पोहोचली आहे. तळेगावमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. हि महिला तळेगावतील २ खाजगी दवाखान्यात या अगोदर उपचारासाठी गेली असल्याने महिलेच्या कुटुंबातील ११ व्यक्ती सह खाजगी हॉस्पिटलचे कर्मचारी १४ दिवस होम क्वारंटईन करण्यात आले आहेत. यापूर्वीही सणसवाडी आणि शिक्रापूर या जवळच्या गावामध्ये करोना रुग्ण आढळले असूनही नागरीक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने या रोगाला एक प्रकारे आमंत्रण दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.


तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिलेल्या माहिती नुसार येथील एका महिलेला रात्रीचा त्रास होऊ लागल्याने गावातीलच खाजगी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तिला करोना विषाणूची काही लक्षणे दिसुन आल्याने कोरोनाची खाजगी चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची घटना घडली आहे. दरम्यान या महिलेला उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात पाठविण्यात आले होते (दि.७) त्यावेळी हा अहवाल  पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या