तळेगाव ढमढेरे येथील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू ...

No photo description available.
तळेगाव ढमढेरे,ता. ९ मे २०२० (जालिंदर आदक): शिरुर तालुक्यात कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला असुन तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील एका ६० वर्षीय महिलेचा अहवाल "एनआयव्ही" ने पॉझिटिव्ह दिला आहे. या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.हि महिला पुणे येथे औंध येथे उपचार घेत होती.त्यामुळे शिरुर तालुक्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असुन आसपासच्या परीसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.




तळेगाव ढमढेरे  येथील वैद्यकीय अधिकारी प्रज्ञा घोरपडे यांनी दिलेल्या माहिती नुसार येथील एका महिलेला रात्रीचा त्रास होऊ लागल्याने गावातीलच खाजगी दवाखान्यात दाखल झाल्यानंतर तिला करोना विषाणूची काही लक्षणे दिसुन आल्याने या महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात पाठविण्यात आले. (दि.७) या दिवशी महिला करोनाबाधित असल्याचे अहवालात समोर आले.



या महिलेने तळेगावतील तीन खाजगी दवाखान्यात अगोदर उपचार केले होते. त्यामुळे महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीसह खाजगी हॉस्पिटलचे कर्मचारी अश्या २० जणांना गावातील मंगल कार्यालयात १४ दिवस होम क्वारंटईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेतले आहेत. तालुक्यात आढळुन आलेल्या करोना बाधित रुग्णाची संख्या आता ५ वर  पोहोचली आहे.


तळेगावमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी सणसवाडी आणि शिक्रापूर या जवळच्या गावामध्ये करोना रुग्ण आढळले असूनही नागरीक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्याने या रोगाला एक प्रकारे आमंत्रण दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे गावाला जोडणारे रस्ते पूर्ण बंद करण्यात आले असून खबरदारी घेतली जात आहे गावातील तीनही दवाखाने आरोग्य विभागाने बंद केले आहे.


भाजीपाला वाहतुकीमुळे संसर्ग झाल्याचा अंदाज...
कोरोना बाधित महिलेचा मुलगा पुण्यावरून भाजीपाला वाहतूक करत होता. त्याला पुण्यातच करोना रोगाची लागण झाल्याने या महिलेच्या संपर्कात येऊन या महिलेला लागण झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर महिला तळेगाव बाजार मैदान मध्ये भाजी विक्री व्यवसाय करत होती. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी करण्यात येणार आहे.

No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या