तळेगाव ढमढेरे येथे आणखी २ जण कोरोना पॉझिटिव्ह...

No photo description available.
शिरुर, ता. ९ मे २०२० (प्रतिनिधी): तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथे कोरोना विषाणूची लागण झाल्याने शुक्रवार (दि ८ ) रोजी ६० वर्षीय महीलेचा मृत्यू झाला होता.त्याच मृत महिलेच्या कुटुंबातील आणखी २ सदस्यांचा चाचणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ प्रज्ञा घोरपडे आणि कोरोना कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भराटे यांनी दिली आहे. त्यामुळे आसपासच्या परीसरातील नागरिक धास्तावले आहेत.


शिरुर तालुक्‍यात आत्तापर्यंत "कोरोना'चे ७ रुग्ण आढळल्याने शहरासह तालुक्‍यातील सर्व गावांचा "रेड झोन'मध्ये समावेश करण्यात आला आहे. शिक्रापूर तसेच तळेगाव ढमढेरे या गावांचा परिसर 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात आला आहे.तळेगाव ढमढेरे मधील कोरोना बाधित रुग्ण पुण्यातील औंध सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. क्वारंटाईन केलेल्या २० जणांपैकी १० जण आरोग्य विभागाच्या अतिदक्षता विभागात देखरेखीखाली आहेत. तर सर्वसाधारण १० जण होम क्वारंटाईनचे पालन करुन घरी थांबले आहेत.
 शिरुर तालुक्यात आत्तापर्यंत तब्बल ७ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असुन त्यातील २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील नागरीक भयभीत झाले आहेत. दरम्यान तळेगाव ढमढेरेमध्ये कोरोनाचा आणखी प्रसार होत होऊ नये यासाठी गावामध्ये येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी क्वारंटईन केलेल्या नागरिकांना धीर देत आहेत.त्याचबरोबर गावातील नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या