'दृश्यम' चित्रपटात दाखविल्याप्रमाणे केला खून पण...

शिरूर, ता. 11 मे 2020 (PoliceKaka): उरळगाव हद्दीत शीर नसलेल्या, धडाचे तुकडे केलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत दोघांना ताब्यात घेतले आहे.



सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मा यांनी गुन्ह्याचा तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिल्या होत्या.


त्याप्रमाणे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय गुंड, पोलिस उप निरीक्षक अमोल गोरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलिस हवालदार उमाकांत कुंजीर, दत्तात्रय तांबे, पोलिस नाईक जनार्दन शेळके, गुरु जाधव, राजू मोमीन, पोलिस कॉन्स्टेबल समाधान नाईकनवरे, अक्षय जावळे, शिरूर पोलिस स्टेशन कडील पोलिस उपनिरीक्षक जगदाळे पोलिस नाईक संजय जाधव यांचे पथक तयार करून तपास कामी रवाना केले होते.


सदर पथकाने सर्वप्रथम गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाचा व त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता संबंधित व्यक्तीचे नाव बापू तावजी शिंदे, (रा. मलठण, ता, शिरूर, जिल्हा पुणे) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय बातमीच्या आधारे चौकशी केली. दृश्यम चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पुरावा मागे न ठेवता खून करण्याचा कट तयार केल्याची माहिती पुढे आली. जालिंदर सुखदेव थोरात, (रा. वाघाळे, ता. शिरूर, जिल्हा पुणे) व हिरामण तुकाराम चोरमले, (रा. उरळगाव, ता. शिरूर, जिल्हा पुणे) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.


तयार केलेल्या कटाप्रमाणे कुऱ्हाडीने वार करून निर्घृणपणे
बापू तावजी शिंदे यांचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे हात, पाय, पोट, कुऱ्हाडीने तोडून मृतदेह भीमा नदीच्या पात्रात टाकून दिला. अशाप्रकारे कोणताही सुगावा मागे नसताना निर्घृण खुनाचा गुन्हा पथकाने उघडकीस आणल्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पथकास बक्षीस जाहीर केले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.

दरम्यान, जालिंदर सुखदेव थोरात (वय 32), लहाणू तात्याबा थोरात (वय 26), सुरेश रामदास खेडकर (वय 29) यांना अटक करण्यात आली असून, 8 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. आरोपींतर्फे ऍड. किरण रासकर यांनी काम पाहिले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या