शिरूरमधून एसटीत बसले अन् चेहऱयावर फुटले हसू...

शिरूर, ता. 12 मे 2020: पुणे, चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहत येथून पायी चालत आलेले मध्यप्रदेशातील, उत्तर प्रदेश, बिहार येथील कामगारांना शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांच्या प्रयत्नाने 8 एसटी बसेसमधून प्रत्येकी 22 त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडवण्यासाठी रवाना करण्यात आले. एसटीत बसल्यानंतर त्यांच्या चेहऱयावर हसू फुटले.
बसस्थानकाचे प्रमुख महेंद्र माघाडे, शिरूर ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी सहकार्य केले. जेवढे लोक आज आम्हाला मिळून येतील, त्या सर्वांना पाठवण्याची जबाबदारी आता माझी राहणार आहे. त्यांना त्यांच्या घराची ओढ आहे. त्यांना इथून गाडी मिळाली त्यांना त्याचे कुटुंबीयांशी लवकर भेट होईल. त्याच्याकडून यापेक्षा दुसरा आशीर्वाद आम्हाला काय मिळणार, पहाटे पाच वाजले तरी चालेल जास्तीत जास्त परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवणार असा दृढनिश्‍चय संतोषकुमार देशमुख यांनी बोलून दाखवला. शासनाने पायी चालणाऱ्या या परप्रांतीयांना एसटी बसची व्यवस्था करून त्यांच्या राज्याचे सीमेपर्यंत सोडवण्याची जबाबदारी सर्व तहसील कार्यालयांना दिली आहे.


या आदेशाची प्रमाणे लगेच या नागरिकांना गोळा करून त्यांना विश्‍वास देऊन त्यांची तपासणी करून येथून जेवणाचे पाकीट घेऊन त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठवले. आतापर्यंत आठ बसेस संध्याकाळपर्यंत जातील त्यानंतर जेवढ्या बसेस लागतील तेवढ्या आम्ही सोडणार असल्याचे तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.दरम्यान, दुपारच्या उन्हाची कायली आणि या भर उन्हात शेकडो परप्रांतीय नागरिक पायी आपल्या गावचे दिशेने निघाले होते. तहान, भूक, होणाऱ्या वेदना, उन्हाचे चटके सर्वकाही विसरून हे नागरिक अंतर कापत होते. तेवढ्यात शिरूर तहसीलदार कार्यालयात शासनाचा आदेश आला की पायी चालणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ एसटी बसने सोडावे. आदेश मिळता क्षणी शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख हे शिरूर जवळ सतरा कमानी पुलाजवळील जिल्हा हद्दबंद केलेल्या ठिकाणी आले व पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना तरुणांना त्यांनी थांबवून ठेवले. तेवढ्यात शिरुर एस टी बस स्थानकाचे महेंद्र माघाडे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाची तुषार पाटील यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन शासनाचा आदेश दाखवला आणि अधिकाऱ्यांनीही ही प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना साथ देण्याचे ठरवले.

काही वेळात एसटी बस, एसटी ड्रायव्हर, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे पथक त्या ठिकाणी आले. जमलेले शंभर-सव्वाशे परप्रांतीय नागरिकांची नावे घेण्याची काम सुरू केले. तर शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी टेंपरेचर मशीन ने त्यांचे टेंपरेचर चेक करणे सुरू केले. काही वेळात तेथे आलेल्या तीन-चार एसटी पैकी प्रत्येकी बसमध्ये बावीस नागरिक बसवण्यात आले.

काही वेळापूर्वी जिवाचा आटापिटा करत पायी निघालेल्या परप्रांतीय नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते की काही क्षणात आपल्या गावापर्यंत जायला आपल्याला वाहनाची व्यवस्था होईल. यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, शिरूर बस स्थानकाचे प्रमुख महेंद्र माघाडे, शिरूर ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.


No photo description available.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या